सुपरफुड्ससुपरफुड्स

SuperFoods हा आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट होणे हे फार गरजेचे असते. कारण प्रत्येक आजारांना लढण्यासाठी प्रतिकारशक्ती खूप गरजेची असते. जर प्रतिकारशक्ती कमी झाली तर तुम्हाला आजारपण अगदी पटकन येऊ शकतात.या आजारांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही काही अशा सुपरफुड्सचा समावेश करायला हवा. तुमच्यासाठी असे सुपरफुड्स निवडले आहेत. जे तुम्हाला अगदी सहज तुमच्या आहारात समाविष्ट करता येतील. चला जाणून घेऊया या सुपरफुड्सची यादी

शेवग्याच्या शेंगा

शेवग्याच्या शेंगा याचे नाव सुपरफुड्समध्ये सगळ्यात वर घेतले जाते. सांबारमध्ये शेवग्यांच्या शेंगा या खूप जणांना खायला आवडतात. याच शेवग्याच्या शेंगा या प्रोटीन आणि मिनरल्सचा भंडार आहे. शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्यामुळे तुम्हाला vitamin A, उर्जा मिळण्यास मदत मिळते. जर तुम्हाला पोटाचे काही त्रास असतील तर ते देखील कमी होण्यास मदत मिळते.

तूप SuperFoods

तूप खाऊन रुप मिळते. असे खूप जण म्हणतात यामागील कारण आहे ते म्हणजे तुपाचे फायदे. तुपाचे सेवन केल्यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल होतात. तेलाच्या तुलनेत तूप हे नेहमीच चांगले आहे असे मानले जाते. दूधाच्या सायेपासून तूप बनवले जाते. तूपामध्ये ओमेगा फॅटी ॲसिड असते. जे शरीरासाठी फार फायद्याचे ठरते. तूपामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होते. मेंदूचे कार्य सुधारते. त्वचा चांगली होण्यास मदत मिळते. हे एक चांगले कोलेस्ट्रॉल आहे

आवळा

थंडीच्या दिवसात आवळा सगळीकडे मिळतो. या दिवसात आवळा नक्कीच खायला हवा. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट आणि न्युट्रीएंट्स असतात जे शरीराला अधिक फायदे देतात. आवळ्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. यासोबत तुमची त्वचा चांगली होण्यासही मदत मिळते. तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

हळद

हळद ही अँटीसेप्टीक असते. आपल्या प्रत्येक जेवणात आपण हळदीचा समावेश करतो. हळदीमध्ये असलेले इन्फ्लमेटरी घटक असतात. जे तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. जे तुमचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करते.

क्विनवा

आता हे सुपरफूड आपल्या देशातील नसले तरी आता खूप जण त्याचा आहारात समावेश करतात. फिटनेस राखण्यासाठी क्विन्वा खाल्ला जातो. हा ग्लुटेन फ्री असल्यामुळे तुमचे वजनही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा साठा असल्यामुळे याचा समावेश तुम्ही आहारात करायला हवा.

या सुपरफूड्सचा तुम्ही नक्की समावेश करायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *