मानसिक तणाव असा करा दूरमानसिक तणाव असा करा दूर

How To Get Over Mental Stress आजच्या घडीला आपल्यातील किती जण मानसिक तणावाखाली आहेत याचा अंदाज येत नाही. वर वर चांगली दिसणारी माणसे कधी आत्महत्या करतात किंवा एखाद्याचा खून याचा आता काही नेम राहिला नाही. मनात उठणाऱ्या वावटळांना योग्य दिशा मिळाली नाही की, त्याची दशा होण्यास वेळ लागत नाही. परंतु मानसिक तणाव हा आताच्या या स्पर्धेच्या युगात अधिक वाढू लागला आहे. आपल्यातीलच कित्येक जण याच्या आहारी कधी जातात हे देखील आपणास कळत नाही. तुम्ही मानसिक तणावाखाली तर नाही ना? एखाद्या गोष्टीने तुमच्या मनात घर केले असेल तर त्याचा ताण हा कधी आपला मानसिक ताण बनून जातो हे कळत नाही. अशा या मानसिक तणावातून आपल्याला बाहेर काढायचे असेल तर हे नक्की करा. तुम्हाला बरे वाटेल.

Vitamin D From Veg Food | या शाकाहारी पदार्थांमधून मिळवा व्हिटॅमिन डी

Henna Application | केसांना मेंदी लावणे चांगले की वाईट, वाचा ही माहिती

तुम्ही तणावाखाली नाहीत ना?

कधी कधी आपल्याला एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस आहे हे ओळखणेही कठीण असते आता तुम्ही म्हणाल हे कसे काय शक्य आहे? एखादी घटना आपल्यासोबत घडली की, त्याचा परिणाम एकतर आपल्याला लगेच जाणवतो. तसे झाले नाही तर कधीकधी आपल्या मनात ती गोष्ट कुठेतरी अडून राहते. कधीकधी काहीही करण्याची इच्छा न होणे, झोप न लागणे, झोप लागणे, रडू कोसळणे असे जर तुमच्यासोबत होत असेल तर तुम्हाला तुमच्याकडे लक्ष देण्याची खूप जास्त गरज आहे. काही गोष्टी तुम्ही कारण नसताना तुमच्या मनाला खूप लावून घेतल्या आहेत. ज्या तुम्ही वेळीच माहीत करुन घ्यायला हव्यात. जर तुमचे वजन अचानक कमी झाले असेल, भूक लागत नसेल तर अशावेळी या गोष्टीही तुमच्या आरोग्यावर परिणाम करत असतात. हे लक्षात ठेवा. कधी कधी अति वजन वाढणे, केस गळणे, त्वचेवर पिंपल्स येणे यामुळेही तणाव येऊ शकतो हे अजिबात विसरु नका.

Walk For Weightloss | किती चालल्याने वजन होते कमी, वाचा महत्वाची माहिती

मानसिक ताणावातून अशी होईल सुटका How To Get Over Mental Stress

मानसिक तणाव दूर करण्यासाठी सध्या सायकोलॉजिस्ट हा एक उत्तम असा पर्याय आहे. पण जर तुम्हाला तेेथे जाणे शक्य नसेल तर तुमचा तुम्हीच मार्ग शोधा. ते जास्त सोपे असते.

  1. तुम्हाला कोणत्या गोष्टीचा ताण आहे. ती गोष्ट ओळखा ती सोडवणे शक्य आहे का बघा. तसे नसेल तर त्या गोष्टीतून मनाने पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी आपली दिनचर्या बदला
  2. एका संकटातून बाहेर पडून दुसऱी गोष्ट सुरु केली म्हणजे तणाव कमी होतो असे नाही. तो केवळ एक मार्ग तुम्हाला नवं काहीतरी करण्याचा असतो. पण ज्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव आला आहे ती गोष्ट पूर्णपणे काय आहे आणि त्यामुळे होणारे नुकसान काय आहे ते देखील जाणून घ्या.
  3. योग हा मानसिक तणाव घालवण्यासाठी उत्तम असा पर्याय आहे. जर तुम्ही नियमितपणे ध्यान धारणा, योगासने आणि प्राणायाम केला तर ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाही त्यांच्याशी कसे वागायचे हे तुम्हाला नक्कीच कळेल.
  4. बोलणे हा तणाव घालवण्यासाठीचा योग्य पर्याय आहे.अशा व्यक्तीशी बोला जी तुमचं सगळं ऐकून तुम्हाला त्यातून काढण्यासाठी मदत करेल.
  5. पुस्तक वाचन किंवा एखादा छंद हा देखील तुम्हाला यातून बाहेर काढण्यास मदत करतो. टेन्शन, तणाव हे केवळ डोकं रिकामी असेल तरच जाणवते.

आता जर तुम्ही मानसिक तणावाखाली असाल तर या काही गोष्टी नक्की करुन पाहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *