Walk For Weightloss चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे हे आपण सगळेच जाणतो. पण वजन कमी करण्यासाठी तुम्ही चालण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला नेमके किती आणि कसे चालायला हवे याची योग्य माहिती असायला हवी. अनेकांना आपण जे चालतो तोच एक व्यायाम आहे असे वाटते. पण चालण्याचेही विविध प्रकार आहेत आणि त्यावरुन तुमचे वजन कोणत्या गोष्टीने कमी होऊ शकते हे तुम्हाला माहीत असायला हवे. चला जाणून घेऊया चालण्यासंदर्भातील ही अत्यंत महत्वाची अशी माहिती.
How Much Coffee | दिवसातून किती कप कॉफी पिणे आहे योग्य
असे चालणे व्यायाम नाही
खूप जण दिवसातून बरेच चालतात असे सांगतात. पण व्यायामासाठी चालणे म्हणजे काय? हे त्यांना कळत नाही. ऑफिसच्या कामासाठी स्टेशनवर चालत जाणे किंवा चालत घरी येणे हा व्यायाम होऊ शकत नाही. त्यामध्ये तुमची अधिक दमछाक होते व्यायाम नाही, याचे कारण असे की, ज्यावेळी तुम्ही चालता त्यावेळी तुमच्या हातात, खांद्यावर वजन असते. चालण्यायोग्य चपलाही तुम्ही घातलेल्या नसतात. तुमच्या चालण्यामध्ये एकसूत्रता नसते. तुम्हाला जशी घाई होईल तसे तुम्ही तुमची गती वाढवता. त्यामुळे होते असे की, तुमच्या चालण्यात एकप्रकारचा व्यायाम नाही ताण असते. दिवसातून केवळ 30 मिनिटे वेळ काढून जर तुम्ही योग्य शूज आणि कपडे घालून जर चाललात तर तुम्हाला त्याचा अधिक लाभ होतो. मग तुम्ही 30 मिनिटे जरी चाललात तरी देखील चालू शकते.
गती नाही, चालणे आहे महत्वाचे
खूप जणांना आपण खूप जोरात चालतो म्हणजे आपण वजन कमी करु असे वाटते. पण हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. असे चालून तुम्हाला वजन अजिबात कमी करता येत नाही. जे जास्त जोरात चालतात आणि शरीराला थकवतात त्यांना गुडघादुखीचा त्रास जास्त होतो. एक दिवस तर ते चालू शकतात. पण त्यानंतर त्यांना गुडघादुखीच्या तक्रारी जाणवू लागतात. त्यामुळे अगदी नव्याने सुरु करणार असाल तर सुरुवातीला हळू आणि मगच गती वाढवावी. परंतु खूप जोरात धावल्यामुळे वजन कमी होण्यापेक्षा शरीर अधिक दुखू लागेल हे नक्की!
योग्यवेळ
हल्लीच्या धकाधकीच्या काळात सगळ्यांनाच सकाळची वेळ चालण्यासाठी निवडता येईल असे नाही काही जणांना संध्याकाळीही चालण्यासाठी वेळ मिळू शकते. तुम्ही केव्हाही चालण्याची वेळ निवडा. केवळ जेवल्यानंतर खूप चालणार नाही याची काळजी घ्या. कारण जेवणानंतर चालल्यामुळे तुमचे अन्न योग्य पचत नाही. त्यामुळे चालण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळची वेळ निवडा.
कितीवेळ चालावे
वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला 30 मिनिटे चालणे गरजेचे असते. सुरुवातीला तुम्ही 30 मिनिटे आणि नंतर 10 हजार पाऊले पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो हा विचार करुन चालले तरी देखील चालू शकते. वजन कमी करण्यासाठी चालणे हा एक असा परिपूर्ण व्यायाम आहे ज्यामुळे तुमच्या संबंध शरीराचे फॅट कमी होते. त्यासोबत जर इतर व्यायामाची जोड मिळाली तर तुमचे वजन लवकरात लवकर कमी होऊ शकते.
आता वजन कमी करायचा विचार असेल तर चाला, पण या गोष्टीचाही विचार करा.