दिवसातून किती कप प्यावी कॉफीदिवसातून किती कप प्यावी कॉफी

How Much Coffee हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडत असेल. फिटनेसच्या बाबतीच हल्ली सगळेजण इतकी सजग झाले आहेत की, अनेकदा आपल्याला आपण जे खातो ते योग्य आहे कही नाही हे जाणून घेणे खूप जास्त आवडते. त्यातल्या त्यात कॉफी हे जगभरात प्यायले जाणारे असे पेय जे अनेकांच्या आवडीचे आहे. खूप जणांच्या दिवसाची सुरुवात ही कॉफीच्या घोटाने होते. ते एक घोट जी एक किक देतो त्यानंतर त्याची इतकी सवय होऊन जाते की, कॉफीशिवाय काहींना सुचणे देखील बंद होऊन जाते. पण तुमच्या शरीरासाठी किती कॉफी पिणे योग्य हे तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? नसेल केला तर आज करा. जाणून घ्या तुमच्या शरीरासाठी किती कप कॉफी हे पिणे योग्य आहे.

चहा-कॉफीमध्ये दूध घालून पिणे हानिकारक

कॉफी चांगली आणि तितकीच वाईटही

कॉफी हे विशिष्ट झाड असून त्याची लागवड काही खास क्षेत्रातच केली जाते. कॉफीचे रोबुस्ता आणि अरेबिका अशा बिया असतात. ज्या भाजून त्यापासून कॉफीच्या बिया तयार होतात. कॉफीचा अरोमाच इतका सुंदर असतो की, अनेकांना त्याचा नुसता सुगंध जरी आला तरी ते पटकन पिण्याची इच्छा होते. कॉफी ही अनेक गोष्टींसाठी फायद्याची आहे. कॉफीमध्ये असलेले कॅफेन हे तुमचा मूड चांगला करण्यासाठी, तुम्हाला उर्जा देण्यासाठी फार फायद्याचे ठरते. पण ते शरीरात जास्त प्रमाणात गेले तरी देखील तुम्हाला त्याचे परिणाम जाणवू लागतात. त्यापैकीच एक म्हणजे निद्रानाश…. हल्ली चांगली झोप ही अनेकांच्या नशिबी नसते. लाईफस्टाईलच्या या सगळ्या गोंधळामुळे आधीच झोपेची तक्रार अनेकांची असते. त्यात कॉफीचे सेवन अति प्रमाणात केले तर झोप येण्यास अडथळे निर्माण होतात. त्यामुळे शरीराची संपूर्ण यंत्रणा ही बिघडू लागते.

आता तुम्ही म्हणाल कॉफी इतकी वाईट आहे तर ती पूर्णपणे बंद का करत नाहीत? तर त्याचे उत्तर असे की, कॉफी हे पेय म्हणून चांगले आहे. पण ते योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे. अगदी कोणतीही चांगली गोष्ट तुम्हाला प्रमाणातच खावी लागते. एखादा हेल्दी वाटणारा पदार्थ अति खाल्ला तरी देखील त्याचा त्रास आपल्याला होतो हे अगदी तसे आहे.

इतकी प्या कॉफी How Much Coffee

आपल्याकडे कॉफीवर इतके प्रयोग केले जातात की, आता त्याची आपल्याला सवय झाली आहे. जसे की, कोल्ड कॉफी, कॅपेचिनो, लाते असे विविध प्रकार चवीला फार छान लागतात. परंतु दोन गोष्टी एकत्र झाल्यामुळे आपल्या पचनशक्तीवर त्याचा भलताच ताण पडतो. जर तुम्हाला कॉफी घ्यायची असेल तर सूर्य मावळण्याच्या आधीच शक्यतो तुम्ही पाण्यात कॉफी घेणे गरजेचे असते. त्याला आपण ब्लॅक कॉफी म्हणतो. ही कॉफी प्यायल्यामुळे कॉफीची खरी चव तुम्हाला कळते. जी इतरवेळी आपण दुधात कॉफी घेतो त्यामुळे आपल्या दुधाचे आणि कॉफीचे असे दोन्ही फायदे मिळणे कठीण होऊन जाते. त्यामुळे जर तुम्हाला कॉफी घ्यायची असेल तर एक कप तोही दिवसा घ्या. कारण कॉफीमुळे झोप उडते. जर तुम्ही दुपारनंतर कॉफी घेत असाल तर तुम्हाला रात्री लवकर झोप येणार नाही.

तुम्ही कितीही छान कॉफी बनवत असाल किंवा तुम्हाला कॉफी आवडत असेल तरी कॉफीची ही शिस्त तुम्ही नक्कीच पाळायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *