Hormonal Acne महिलांच्या शरीरात कायम बदल होत असतात. मासिक पाळी, प्रेग्नंसी, तिशी असे वयाचे विविध टप्पे ओलांडताना त्यांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. या टप्प्यांमध्ये त्यांच्या शरीरात होणारे बदल हे हार्मोन्समुळे होत असतात. आपल्या शरीरात विविध हार्मोन्स विविध गोष्टी करण्याचे काम करत असतात. त्यांचे शरीरातील प्रमाण वरखाली झाले की, त्याचा परिणाम हा तुमच्या शरीरावर होऊ लागतो. विशेषत: महिलांमध्ये हे परिणाम अधिक दिसून येतात. वजन वाढणे, वजन कमी होणे, त्वचा निस्तेज दिसणे, अचानक पिंपल्स येऊ लागणे असे त्रास होऊ लागतात. पिंपल्सवर वर वर इलाज करुन तात्पुरता दिलासा मिळतो. पण त्यातून सुटका होते अशी नाही. याचे कारण असे की, त्याचा त्रास हा तुमच्या हार्मोन्सवर अवलंबून असतो. त्यासाठी तुम्ही काय करता? जर उत्तर काहीही नसेल तर तुम्ही त्यासाठी हे बदल केले तरच तुमची खऱ्या अर्थाने त्यातून सुटका होऊ शकते.
Skin Care Winter |हिवाळ्यात त्वचा अशी ठेवा मॉश्चराईज
रक्ततपासणी Hormonal Acne

खूप जण वर्षातून एकदा तरी रक्ततपासणी करतात. त्यामुळे शरीरात कशाची कमतरता आणि काय जास्त हे आपल्याला कळते. हल्ली बारीक दिसणाऱ्या लोकांनाही कोलेस्ट्रॉलची तक्रार असते. असे का? हे तुम्ही कधी माहीत करुन घेत नाही. नुसते कोलेस्ट्रॉल वाढले हे सांगून त्यावर उपाय करणे होत नाही. ते वाढले याचे कारण शरीरातील इतर गोष्टी कमी झाल्या आहेत. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणारी प्रणाली कुठेतरी आपले काम करत नाही हे त्यामागील कारण असू शकते. अजाणतेपणी आपल्यावर असलेला स्ट्रेस हे देखील त्याचे कारण असू शकते. याच तपासणीतून तुम्हाला तुमच्या शरीरातील इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन जे तुमच्या प्रजनन क्षमतेशी निगडीत असलेल्या हार्मोन्सविषयी सांगते जर तुमच्या शरीरात यापैकी काहीही वाढले तरी त्याचा परिणाम हा त्वचेवर अतिरक्त सीबम निर्माण होण्यामध्ये होते. परिणामी तुम्हाला पिंपल्सची तक्रार सुरु होते. काही केल्या हे पिंपल्स जात नाही. याला ओळखायचे असेल तर साधारण तुमचा हनुवटीच्या पट्ट्यापासून ते कानांपर्यंत हे पिंपल्स येतात. हे अधिक काळे, मोठे आणि दुखणारे असतात. त्यामुळे वेळोवेळी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी करा.
लाईफस्टाईलमध्ये बदल
वर वर उपचारपद्धती करुन तुम्हाला नक्कीच काही काळासाठी आराम मिळू शकतो. तुमचे पिंपल्स थोडे कमी होऊ शकतात. पण याची अजिबात खात्री देता येत नाही की ते परत येणार नाहीत. याचे कारण असे की हार्मोन्सने आलेले पिंपल्स पुन्हा पुन्हा डोकं वर काढतात. जोपर्यंत तुम्ही त्याची सिस्टीम सुधारण्याचा प्रयत्न करत नाही. यापासून सुटका मिळवायची असेल तर तुमच्यापुढे ‘लाईफस्टाईल बदल’ हा एकच पर्याय उरतो जो 100 % काम करतो. हा बदल पुढील प्रमाणे
- झोपेची वेळ बदला- शरीराला 7 ते 10 तासांची झोप अपेक्षित असते ती झोप पूर्ण करा.
- खानपान सवयी- खानपानाच्या सवयी यासगळ्यात जास्त परिणाम करतात. तुमच्या वयोमानानुसार तुमचे डाएट असायला हवे. उदा. बाहेरचे जंक फूड कमी करा (आठवड्यातून एकदा चालेल), जास्तीत जास्त भाज्या, फळे, फळभाज्या यांचा आहारात समावेश करा. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. चांगलं खाल्लं की, ते तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसून येईल.
- दिवसातून केवळ 30 मिनिटे हे तुम्ही शूज घालून, अंगावर कोणताही ताणं न घेता चालायला हवे. ज्याला आपण व्यायाम असे म्हणू शकतो. (ज्यांना वजन वाढले असे वाटत असेल अशांनी तर नक्कीच आपले वजन कमी करण्याचा विचार करायला हवा.
- 10 मिनिटे ध्यानस्थ बसून स्ट्रेस कमी करायला हवा. त्यामुळेही बराच परिणाम होतो.
स्किनकेअर
वरील काळजी घेताना तुम्ही त्वचेची काळजी ही योग्य घ्यायला हवी. चेहऱ्याची स्वच्छता राखायला हवी. चेहरा दिवसातून दोन वेळा धुणे, आठवड्यातून एकदा स्क्रब करणे, एकदा फेसपॅक लावणे, दररोज थोडा थोडा मसाज करणे, मॉश्चरायझर आणि टोनर यांचा वापर करणे टाळता कामा नये. यामुळे तुम्ही घेत असलेली काळजी तुमच्या चेहऱ्यावर अधिक दिसून येईल.
आता जर तुम्हालाही असा त्रास असेल तर तुम्ही या गोष्टी नक्की करा.