Skin Care Winter मध्ये आज आपण आपली त्वचा हिवाळ्याच्या या वातावरणात कशी मॉश्चराईज ठेवावी हे जाणून घेणार आहोत. अनेकांसाठी हिवाळ्यात त्वचेच्या तक्रारी कमी होत असल्या तरी काही जणांसाठी हाच हिवाळा त्रासदायक असतो. थंडीच्या या दिवसात जर त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर त्वचा अधिक शुष्क आणि कोरडी दिसू लागते. त्यामुळे त्वचा योग्य मॉश्चराईज करणे फारच गरजेचे असते. वेगवेगळ्या त्वचेनुसार स्किन मॉश्चराईज करणे हे वेगवेगळे असते. त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घेऊया यातील फरक आणि टिप्स
Amla For Hair | केसांसाठी आवळ्याचा उपयोग
कोरडी त्वचा Skin Care Winter
कोरडी त्वचा असेल तर अशांसाठी हिवाळ्यातील स्किनकेअर खूपच जास्त महत्वाचे असते. अशांनी त्यांची त्वचा सतत मॉश्चराईज ठेवायला हवी. त्यासाठी चांगले मॉश्चराईज निवडा. तुम्ही महागडे मॉश्चराईज निवडणे गरजेचे नसते. तर तुमच्या त्वचेला शोभेल असे मॉश्चराईज निवडायला हवे.
तेलकट त्वचा
तेलकट त्वचेसाठी मॉश्चराईजर गरज या दिवसात नसते असे अजिबात नाही. मॉश्चराईजर हे कायमच लावणे गरजेचे असते. ते त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी तेलकट घटक असलेले घटक टाळा. कारण त्यामुळे तुम्हाला पिंपल्स येण्याची शक्यता असते. तुम्ही लावत असलेले मॉश्चराईज हे लाईट असायला हवे. तरच तुमची त्वचा ही तजेलदार दिसू शकेल.
संवेदनशील त्वचा
तुमची त्वचा जर खूपच संवेदनशील असेल तर तुम्ही योग्य सल्ला घेऊन मॉश्चराईजर लावायला हवे. कारण तुमच्या त्वचेला एखादे मॉश्चराईजर हे अधिक त्रासदायक ठरु शकते. त्यामुळे तुम्ही योग्य असे मॉश्चराईजर निवडा.
उत्तम आहार
वरुन कितीही त्वचा मॉश्चराईज करणे सोपे असले तरी त्वचा ही आतून अधिक चांगली ठेवायची असेल तर तुम्ही आहारही तसाच चांगला घ्यायला हवा. आहारात योग्यप्रमाणात तिळ, आवळा, गुळ, सीझनल फळांचा समावेश करा. त्यामुळेही तुमची त्वचा अधिक चांगली राहील. या काळात शरीराला आतून उष्णता देणारे पदार्थ खायला हवेत. त्याचेही फायदे तुम्हाला मिळतील.