संतुलित आहार असेल तर शरीराचे संतुलन राखणे अधिक सोपे जाते. शरीरात एखादाही घटक जास्त किंवा कमी झाला की, त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर पटकन दिसून येतो. गेल्या काहीवर्षांपासून कोलेस्ट्रॉलची समस्या ही अनेक जणांना जाणवत आहे. या कोलेस्ट्रॉलचा विपरित परिणाम हा ह्रदयाच्या आरोग्यावर होतो हे खरे असले तरी याचे काही परिणाम त्वचेवरही दिसून येतात. कोलेस्ट्रॉलची तपासणी केली नसेल पण तुम्हाला काही लक्षण जाणवत असतील तर तुम्हालाही कदाचित कोलेस्ट्रॉलचा त्रास असू शकतो.
स्त्री आणि पुरुष दोघांनाही कोलेस्ट्रॉलची समस्या होऊ शकते. हा बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आहे हे तितकेच खरे आहे. योग्य लाईफस्टाईल म्हणजे आहार-विकार असेल तर ही समस्या आटोक्यात येते. पण खूप जणांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे हे लक्षात येत नाही. अशावेळी त्वचेवर काही लक्षणे दिसून येतात. तुम्हाला असा काही त्रास सुरु झाला असेल तर त्याकडे तुम्ही अधिक जातीने लक्ष द्यायला हवे.
त्वचेला खाज येणे : कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर शरीर काही संकेत देत असते. त्यापैकी एक संकेत म्हणजे त्वचेला खाज येणे. कोणतेही कारण नसताना जर शरीराला खूप खाज येत असेल किंवा त्वेचची जळजळ होत असेल तर अशावेळी तुम्ही योग्य तो उपचार घ्या. शरीराला येणारी ही खाज अगदी कुठेही येऊ शकते. जर तुम्हाला शरीराला येणारी खाज असह्य असेल तर योग्यवेळी काळजी घ्या.
मोठे पिंपल्स : पिंपल्सचा त्रास हा थोड्याफार प्रमाणात सगळ्यांनाच असतो. पण कोलेस्ट्रॉलची समस्या अधिक वाढू लागली असेल तर सतत मोठे मोठे पिंपल्स येऊ लागतात. जर तुम्हाला असे वेदनादायी पिंपल्स येत असतील तर त्यामागे कोलेस्ट्रॉल हे एक कारण असू शकते.
त्वचा अधिक लाल दिसणे: त्वचेवर लाली असणे आणि त्वचा लाल पडणे- त्वचा सुजणे असे काही दिसत असेल तर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास झालेला त्वचा ही अगदी क्षुल्लक कारणामुळे लाल दिसू लागतो. असा त्रास सतत होत असेल आणि त्वचेचा त्रास सुधारत नसेल तर अशावेळी तुम्ही योग्य सल्ला घेणे चांगला
डोळ्यांखाली सूज: काही वयानंतर डोळ्याखाली सूज येणे हे अगदी स्वाभाविक आहे. पण काही जणांना अगदी लहान वयात डोळ्यांखाली सूज दिसू लागतात. डोळ्यांखाली आलेली सूज जर थोडी हिरव्या रंगाची आणि त्यावर बारीक बारीक पुळ्या आल्या असतील तर हा कोलेस्ट्रॉलचा त्रास असू शकतो.
त्वचेवर जर तुम्हाला ही काही लक्षणे जाणवत असतील तर त्यामागे तुमचे वाढलेले कोलेस्ट्रॉल हे एक कारण असू शकते.