Engagement

सध्या सगळीकडे साखरपुडा आणि लग्नाचे वारे वाहत आहेत. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत मराठमोळ्या तीन जोड्यांनी आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. बिग बॉस ४ फेम अभिनेता निखिल राजेशिर्के, ‘सारं काही तिच्यासाठी’ मधील प्रमुख भूमिका साकारणारा श्रीनू अर्थात अभिनेता अभिषेक गावकरने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोनालीसह साखरपुडा केलाय तर ‘राजा राणीची गं जोडी’ मधील कमालीचा अभिनय साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनारनेदेखील अभिनेता अंबर गणपुळे याच्याशी साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. (फोटो सौजन्य – @shivani.sonarofficial_ @abhigaonkarr) 

सध्या सगळीकडेच प्रेमाचे वारे वाहताना दिसून येत आहेत आणि सेलिब्रिटीही त्याला अपवाद नाहीत. गुढीपाढव्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि या शुभमुहूर्तावर मराठीतील तीन जोड्यांनी आपल्या संसाराचा पाया रचला आहे. 

अचानक साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत सर्वांनीच आपल्या चाहत्यांना धक्का दिलाय. अर्थात चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे. निखिल राजेशिर्के, शिवानी सोनार आणि अभिषेक गावकर हे तिघेही अभिनय क्षेत्रात असून त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळे सर्वांनीच आता त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सोशल मीडियावर शुभेच्छा देत अभिनंदनाचा वर्षाव केल्याचे दिसून येत आहे. 

Marathi News Flash कडूनही या तिन्ही जोड्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *