Share Market हे सध्याच्या घडीला असे क्षेत्र झाले आहे की जे तुम्हाला तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करते. शेअर मार्केटविषयी आपण बरेच काही ऐकले असेल. अनेकांना यामध्ये नुकसान झाल्यामुळे खूप जण याच्या वाट्यालाही जायला पाहात नाही. पण आताच्या या काळात जर अधिकचे पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला असा काही पर्याय निवडायला हवा जेणेकरुन तुम्हाला तुमच्या जास्तीच्या गरजा पूर्ण करता येतील. त्यासाठी तुम्हाला हवे शेअर मार्केटचे योग्य असे ज्ञान असायला हवे. जर ते ज्ञान असेल तर तुम्हाला यात पैसा आणि मन गुंतवायला काहीच हरकत नाही. चला जाणून घेऊया शेअर मार्केटचे काही नियम
अभ्यास महत्वाचा
जर तुम्हाला शेअर मार्केट करायचे असेल तर लगेच आज शिकून तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्यातून काहीही कमाई करता येणार नाही. तुम्हाला त्यासाठी सातत्याने अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास तुम्ही केला तर त्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी तुम्ही प्रॅक्टिस करायला हवी. त्यामुळे तुम्ही जे शिकला आहात त्यातून तुम्हाला फायदा कसा काढायचा ते तुम्हाला कळेल. त्यामुळे जितकं शक्य असेल तितका जास्त अभ्यास तुम्ही करा.
भुलथापांना बळी पडू नका
खूप जण तुम्हाला दुसऱ्या दिवशी श्रीमंत करण्याचे स्वप्न दाखवून जर काही शॉर्टकर्ट सांगत असतील तर अशा शॉर्टकटपासून दूर राहा, कारण असे एका दिवशीच सगळे मिळणे शक्य नसते. त्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत आणि वेळ देणे गरजेचे असते. सुरुवातीचा काळ हा तुमच्यासाठी थोडा कठीण असेल पण त्यानंतर मिळणारी फळे ही कायम गोड असतील हे लक्षात घ्या. त्यामुळे चुकीचा सल्ला ऐकून काहीही करण्यापेक्षा अभ्यास करुन सगळे करा.
New Year Resolutions 2024 | नव्या वर्षासाठी नवे संकल्प, एकदा वाचाच
कँडलचा करा नीट अभ्यास
शेअर मार्केट सुरु करताना कँडलचा अभ्यास हा खूप महत्वाचा असतो तो अभ्यास जर तुम्ही केला तर तुम्हाला त्यातून फायदा मिळण्यास मदत मिळेल. तुम्ही जितक्या कँडलचा अभ्यास कराल तितका त्याचा फायदा होण्यास तुम्हााल मदत होईल. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही खूप गुंतवणूक करुन काहीही करण्यापेक्षा ज्याच्याकडे तुम्ही शिकताय तेथून पूर्ण माहिती घ्या. एक तर एकच गुरु कडून ही माहिती घ्या. अन्यथा तुमचा नाहक गोंधळ होईल.
सातत्य ठेवा
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही त्याचे सातत्य राखणे गरजेचे असते. जर तुम्ही ते राखले तर यश तुम्हाला मिळणारच यात कोणतीही शंका नाही. परंतु जर तुम्ही धरसोडवृत्तीने काम करत असाल तर मात्र जे अपेक्षित असे यश आहे ते कधीच मिळणार नाही. तुम्ही सातत्याने ते करणे गरजेचे असते. शिवाय अपयश आले म्हणून ते काम सोडून देणे हे देखील चांगले नाही. जो पडत नाही तो उठत नाही हा नियम कायम लक्षात ठेवा.
आता शेअर मार्केट करुन अधिकचा पैसा कमवाउत्तम करिअर घडवा.