New Year Resolutions हे आपण प्रत्येक वर्षी करतो. काही अगदी वर्षभर केलेले नवे संकल्प पाळतात. तर काहींचा अगदी काहीच दिवसातच संकल्प तुटून जातो. अहो पण संकल्प असतातच तुटण्यासाठी नाही का? तुम्ही करत असलेले संकल्प हे खूप कठीण असल्यामुळे असे होत असेल. त्यामुळे संकल्प करताना असे करा जे तुमच्याकडून पूर्ण होणे शक्य असेल. त्याचा फायदाही तुम्हाला होईल पण नुकसान मात्र काहीही होणार नाही. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही लहान पण तुमच्या स्वत:साठी फारच उपयुक्त ठरतील असे संकल्प निवडले आहेत. चला जाणून घेऊया संकल्पाची ही यादी. या शिवाय नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यास मुळीच विसरु नका.
आरोग्यदायी संकल्प
2023 हे वर्ष तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीकोनातून मिश्र गेलं असेल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जर तुमचं हे सरतं वर्ष खूप छान गेलं असेल तर पुढच्या वर्षीही ते तसंच असावं यासाठी तुम्ही काही संकल्प करणे गरजेचे आहे. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
- नव्या वर्षात मी दिवसातून दोन वेळा दोन वेगळी फळं खाईन ( हे अगदीचं सोपं आहे. दिवसातून दोन वेळा तुम्हाला फळ ही खाताच येतील.)
- दिवसातली 30 मिनिटे ही मी माझ्यासाठी काढीन.
- बाहेरचे पदार्थ मी संपूर्ण बंद नाही तर प्रमाणात खाईन जेणेकरुन मला त्रास होणार नाही.
- जेवढं शक्य असेल तेवढं मी चालेन (किमान 30 मिनिटं)
- सकाळी लवकर उठून मी उत्तम नाश्ता करीन
- वाईट सवयी असल्यास त्या मी कमी करण्याचा वर्षभरात प्रयत्न करीन
- झोप ही आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. मी शरीराला आवश्यक असलेल्या वेळेत झोपेन
- आरोग्य चांगले राखण्यासाठी मी आठवड्यातून किमान एकदा योगा करेन
- आरोग्याच्या तक्रारींकडे मी मुळीच दुर्लक्ष करणार नाही याची काळजी घेईन
- आरोग्यासाठी मी आवश्यकतेनुसार पाणी प्यायचे लक्षात ठेवीन
आर्थिक संकल्प New Year Resolutions
तुम्ही काहीही म्हणा कधी कधी काही गोष्टी खरंच आपल्या हाती नसतात. त्यापैकी एक म्हणजे खर्चाचे गणित. कारण तुम्ही कितीही प्लॅन केला तरी तुमच्या काही खर्चांना कायम कुठून तरी फाटे फुटत असतात. असे झाले की,पण काय आर्थिक गणित New Year Resolutions गडगडते. आता काही गोष्टींना इलाज नाही. पण काही खर्च आपण नियंत्रणात आणू शकतो किंवा काही तरतुदी वर्षभरात नक्कीच करु शकतो.
- आपला कोणता खर्च जास्त आहे आणि कोणता अगदीच टाळण्यासारखा नाही या दोन्ही गोष्टींची यादी करा. त्यातूनही कोणता खर्च आटोक्यात आणता येईल ते बघा.
- या वर्षात काही मोठे घ्यायचे ठरवले असेल तर त्यानुसार तुमच्या खर्चांना थोडा आळा घाला.
- कधीकधी छोटी केलेली गुंतवणूकही काही गोष्टींसाठी फायदेशीर ठरते.जमेल तेवढ्याची RD सुरु करा. वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे जी रक्कम येईल ती कदाचित तुम्हाला कमी वाटेल परंतु ती कधीतरी तुम्हाला नक्कीच कामाला येईल.
- खर्च लिहून ठेवू नका. कारण त्यामुळे ते कमी होत नाहीत. उलट वाढत जातात.
- कमाईलचा स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमच्यावर आर्थिक ताण येणार नाही
- खर्च आल्यास त्यावरुन चिडचिड करण्यापेक्षा तुम्ही त्यावर उपाय काय करु शकता ते बघा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही.
- लग्न किंवा काही मोठ्या गोष्टी या वर्षात करायचा विचार असेल तर त्यासाठी तुम्हाला लागणारा पैसा कसा जमा करता येईल ते पाहा.
- आपल्या सगळ्यांचे काहीना काही अनावश्यक खर्च असतात. त्याची मात्र यादी करा तो खर्च करताना थोडा पुढचा विचार करा.
- महिन्याच्या सुरुवातीला पगार येत असेल तर तो लगेच खर्च करु नका. महिन्याच्या शेवटी करा. म्हणजे पुढचा पगार येईपर्यंत वाट पाहावी लागणार नाही.
- एक पैशांची गुल्लक आणून त्यात जमतील तेवढे पैसे जमा करा. त्यातही बरेच पैसे जमतात बरं का!
स्वत:साठी संकल्प
आयुष्य जगताना आपण स्वत:ला विसरुन जातो. ते विसरुन कसे चालेल? आपल्या चांगल्या आयुष्यासाठी आपण सगळे करतो आणि आपल्यालाच कसे काय विसरतो. यंदा स्वत:साठी थोडा वेळ काढा आणि जगा. त्यानेही तुमचं हे नवं वर्ष खूप चांगलं जाईल.
- कोणता छंद जो तुमच्या कामामुळे मागे पडला असेल तर त्यासाठी थोडावेळ काढा. त्यामुळे तुम्ही हरवणार नाही.
- वेळ काढून स्वत:कडे लक्ष द्या. स्किनकेअर, हेअर केअर हे आपण चांगले दिसण्यासाठी नक्की करा.
- स्वत:साठी वेळ काढून जर एकटे फिरा. सतत कोणासोबत फिरणे गरजेचे नसते. एकटं फिरूनही कधीकधी थोड मोकळं आणि बरं वाटतं.
- यंदाच्या वर्षी तुम्ही स्वत:ला काहीतरी चांगलं भेट देण्याचा विचार करा. मग ती एखादी चांगली साडी का असेना स्वत:ला स्वत:हून आवडीने विकत घ्या.
- एखादी सोलो टूर करता आली तर करा
- तुम्हाला जसा आवडतो तसा पदार्थ आठवड्यातून एकदा तरी करण्याचा प्रयत्न करा
- तुमच्यावर लाख जबाबदाऱ्या असतील पण कधीकधी त्या बाजूला ठेवून स्वत:साठी एक कॉफी घेऊन शांत कॅफेमध्ये बसा
- जी जुनी नाती कुठेतरी मागे राहिली ती नाती पुन्हा जोडता येतात का ते बघा. त्यानेही तुम्हाला एक वेगळं सुख नक्की मिळेल.
- कधीतरी आपल्या मनाचं ऐका. काही निर्णय तुमचे तुम्ही घ्या.
- तुम्ही जे करताय त्यात काहीही आवड नसेल तर दुसरा मार्ग या नव्या वर्षात शोधण्याचा प्रयत्न करा.
मग नव्या वर्षात New Year Resolutions करायला विसरु नका. हे संकल्प फार कठीण नाहीत.