Makar Sankranti Information आज आपण या लेखातून घेणार आहोत. वर्षाच्या सुरुवातीला येणारा हा सण हिंदू धर्मात विविध पद्धतीने साजरा केला जातो. 15 जानेवारी रोजी मकरसंक्रात येते. वर्षातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणून याकडे पाहिले जाते. पौष महिन्यात साजरा केला जाणारा हा सण विविध नावाने ओळखला जातो. जसे की, महाराष्ट्रात आपण त्याला मकरसंक्रात म्हणतो. बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती, नेपाळमध्ये माघे संक्राती, गुजरातमध्ये उत्तरायण, आसाममध्ये बिहू, जम्मूमध्ये माजी संक्राद,मध्य भारतात सुक्रात,राजस्थानमध्ये सकरत असे देखील त्याला म्हणतात. मुळात या शब्दाचा अर्थ हा संक्रमण असा आहे. या काळात सूर्याचे संक्रमण होत असते. त्यामुळे वातावरणात अनेक बदल होण्यास सुरुवात होते. हे बदल साजरा करणारा असा हा कालावधी आहे. संक्रातीपासून रथसप्तीपर्यंत विविध दिवस साजरे केले जातात. जसे की, हळदीकुंकू, बोरन्हाण, पतंग उडवणे वगैरे वगैरे.
पौराणिक दाखले
मकरसंक्रात हा सण कधी पासून साजरा केला जातो असा विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की, त्याला ठोस अशी कोणत्या काळाची मान्यता नाही. त्यामुळे साहजिकच पुराणातील काही दाखले यामध्ये कामी येतील. पौराणिक दाखल्यानुसार असे मानले जाते की, संक्रात नावाची एक देवता आहे. दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावरुन येते. जसे की,गाढव,हत्ती, डुक्कर पण त्याचा नेमका काय संबंध आहे तो आजही काही जणांना माहीत नाही.
शिवाय असे ही म्हटले जाते की, महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक हे बाणाच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पाहत होते. त्यांना इच्छा मरणाचे वरदान होते. ज्यावेळी उत्तरायण सुरु झाले त्यावेळी त्यांनी प्राण त्याग केला. त्यामुळे दक्षिणायन हे अधिक शुभ मानले जाते. अशा काही दाखल्यावरुन त्याचे महत्व पटून येते.
अशी साजरी केली जाते संक्रात

महाराष्ट्रात आपण तीन दिवस संक्रात साजरी करतो. संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. या दिवशी या काळात मिळणाऱ्या सगळ्या भाज्या पोटात जाण्यासाठी विशिष्ठ भाजी केली जाते. त्याला भोगीची भाजी म्हणतात. दुसऱ्या दिवशी मकर संक्रात केली जाते. संक्रातीच्या दिवशी तिळाचे लाडू एकमेकांना दिले जातात. तर संक्रातीच्या नंतर किंक्रांत साजरी केली जाते. रथसप्तमी हा संक्रांतीचा शेवटचा दिवस या दिवस रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू घातले जाते.
तर असा हा मकरसंक्रातींचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.