Seema Deo मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून घरोधरी पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी अशीही त्यांची एक ओळख होती. सिनेसृष्टीतील अत्यंत प्रसिद्ध अशी त्यांची जोडी होती. रमेश देव यांचे 2022 मध्ये निधन झाले आणि आता सीमा देव यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने संबंध सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.
सीमा देव या काही काळापासून ‘अल्झायमर’ या आजाराने त्रस्त होत्या.त्यांच्या आजाराची माहिती त्यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य आणि दिग्दर्शन अभिनय देव यांनी सोशल मीडियावरुन दिली होती. अल्झायमरशी त्यांचा लढा सुरु आहे. त्या लवकर बऱ्या होतील असा विश्वास कुटुंबियांना आहे अशा आशयाची पोस्ट लिहून सीमा देव यांच्या आजाराशी निगडीत माहिती देण्यात आली होती. त्या सध्या त्यांच्या मुलासोबत वांद्रे येथे वास्तव्यास होत्या.
Rakhi Sawant : राखीनेच मला फसवले, मारले- आदिल दुर्रानीचे आरोप
सीमा देव यांना अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या जाण्याचा शोक व्यक्त केला आहे.

‘भारतीय चित्रपट सृष्टीत रमेश देव (Ramesh Deo ) आणि सीमा देव (Seema Deo) यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. पडद्यावर आणि प्रत्यक्षातही आदर्श दाम्पत्य, प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे अनेकांशी स्नेहाचे संबंध होते. देव कुटुंबीय गत अनेक दशके कला क्षेत्राची सेवा करत आहे. सीमा देव यांनी अनेक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण व्यक्तीरेखा साकारून आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा परिचय दिला आहे. त्यांच्या जाण्याने देव कुटुंबीय आणि चाहत्यांवर आघात झाला आहे. त्यांना यातून सावरण्याचे सामर्थ्य मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
सीमा देव यांनी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटांमध्ये प्रमुख अशा भूमिका बजावल्या आहेत. ‘आनंद’ या चित्रपटात रमेश देव आणि सीमा देव यांची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात राहील अशी आहे. सीमा देव यांच्या जाण्याने नक्कीच सिनेसृष्टीतील आणखी एक रत्न हरपले अशाच प्रतिक्रिया उमटत आहे.