Rakhi Sawant ड्रामा क्वीन कधी काय बरळेल सांगता येत नाही. काही महिन्यापूर्वी तिचा पती आदिल दुर्रानीवर तिने गंभीर असे आरोप करत त्याला तुरुंगवास भोगायला भाग पाडले. तब्बल 6 महिने आदिलने तुरुंगात काढले. पण सहा महिन्याची शिक्षा भोगून आल्यानंतर आता मात्र आदिलने आपली बाजू मांडायला सुरुवात केली आहे. मीडियासमोर येऊन त्याने राखीच्या आरोपावरुन पर्दाफाश केला आहे. राखीनेच त्याला फसवले आणि मारले असा गंभीर आरोप त्याने राखीवर केला आहे. इतकेच नाही तर त्याने अन्य काही गोष्टींचाही खुलासा केला आहे.
आदिलची सुटका राखीची कोंडी
अटक होण्याआधी आदिलने राखीबद्दल कोणतीही विधान केली नव्हती. त्याने लग्न केल्याची शिक्षा राखीचे आरोप आणि तुरुंगवास भोगून केली. पण आता आदिलची सुटका झाली आहे. आदिलने राखीने काय काय केले हे सांगायला सुरुवात केली आहे. राखीने कोणताही दोष नसताना मला फसवून या सगळ्यात अडकवले असल्याचे सांगितले आहे. राखीसोबत लग्न करण्याला त्याने कोणताही विरोध केला नाही. पण राखी लग्न करण्यासाठी मागे लागली होती हे ही त्याने स्पष्ट केले. राखीने आदिलवर धर्मपरिवर्तनाचा गंभीर आरोप लावला होता.पण आदिलने त्याला विरोध केला आहे. आदिलने सांगितले की, मी धर्मपरिवर्तनासंदर्भात काहीही सांगितले नाही. तिला तिचे कपडे आणि बोलणे चांगले ठेव इतकेच सांगितले होते. लग्न करण्याच्या आधी ती माझी अट होती. पण राखीनेच मी हिजाब घालीन. नमाज पडेन आणि तुझ्या कुटुंबाकडून होकार मिळवेन असे सांगून नमाज पडण्यास सुरुवात केली होती.
इतकेच नाही तर त्याने राखीच्या आधीच्या लग्नासंदर्भातही काही धक्कादायक असे खुलासे केले आहे. त्याने सांगितले की, राखीने रितेशसोबत लग्न केले आहे. ती त्याच्यासोबत अजूनही राहते. त्याचे काही पुरावे माझ्याकडे आहे. राखीने रितेशशी लग्न केले नाही असे मला सांगितले होते. पण प्रत्यक्षात असे काहीही नव्हते. राखीने आदिलवर मारण्याचे आरोप केले होते. पण आदिलने वेगळेच सांगितले आहे. त्याने मुलाखतीत सांगितले की, मला सांगायला लाज वाटते पण राखीनेच माझ्यावर अनेकदा हात उचलला आहे. ती मला सतत मारायची. ही गोष्ट मी कधीही समोर येऊ दिली नाही. आता हे सगळे खरे बाहेर आल्यानंतर राखीची कोंडी होण्याची शक्यता दाट आहे.
राखी करते कांगावा
मधल्या काळात राखीच्या आईचे कॅन्सरने निधन झाले. त्यावेळी आदिल तिच्यासोबत होता. पण आदिलने जे काही सांगितले ते ऐकल्यानंतर राखीवर अनेकांना राग येऊ लागला आहे. राखीला तिच्या आईची फारशी काळजी नव्हती. तिचे वागणे हे फक्त दिखाव्याचे होते. आईच्या नावाने ती अनेकांकडून पैसे मिळवत होती. ती स्वत: च्या आईचा उपयोगही केवळ पब्लिसिटी स्टंट म्हणून करत होती. ती खूप हुशार आहे. तिला कोणाला कसं फसवायचं हे चांगलंच माहीत आहे. ते ती सहज करते.
राखीला अद्दल घडवणार
आदिल ज्या पद्धतीने सगळीकडे मुलाखती देत आहे. त्यावरुन तो आता राखीला चांगलाच शिक्षा देण्याच्या बेतात दिसत आहे. त्याने राखीविरोधात पुरावे गोळा केले असून त्याने ते दाखवण्यास सुरुवात देखील केली आहे. तर दुसरीकडे राखीनेही त्याच्याविरोधात सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली आहे.
आता या सगळ्यामध्ये आदिल खरा की राखी हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल यात काही शंका नाही.