oral cancer

तोंडाचा कर्करोग हा तोंडाच्या त्या भागांवर परिणाम करतो ज्यात जीभ, गालाचा आतील भाग, वरच्या किंवा खालच्या जबड्याची हाडे, जीभेखालील जागा आणि ओठ यांचा समावेश होतो. तोंडाच्या पोकळीत, ओठ, गाल किंवा जबड्यावर सततच्या जखमा, गाठ, पांढरे किंवा लाल चट्टे पडणे जे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकतात हे लक्षण असू शकते. 

तोंड उघडण्यास त्रास होणे, जबड्याला सूज येणे आणि लाळेवाटे रक्त येणे याचा अर्थ तोंडाचा कर्करोग होऊ शकतो.  प्रत्येक रुग्णाला तोंडाच्या कर्करोगाविषयी पुरेपुर जनजागृती केल्यास गैरसमज दूर करता येतात. तोंडाच्या कर्करोगाच्या गुंतागुंतीमुळे अनेकदा निदानास उशीर होतो. उपचारास बिलंब झाल्यास भविष्यात गुंतागुत वाढते. डॉ.  रविकुमार वाटेगावकर, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटर, सातारा यांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे.  (फोटो सौजन्य – iStock)

तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित गैरसमजुती कोणत्या?

फक्त धूम्रपान करणाऱ्यालाच तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते हा एक गैरसमज आहे. तंबाखू, चुना, खायचे पान, सुपारी, गुटखा आणि मद्यपान यांच्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. धूम्रपान न करताही पॅसिव्ह स्मोकिंगमुळे कर्करोग होऊ शकतो. ह्युमन पॅपिलोमाव्हायरसमुळे (HPV) सुद्धा तोंडाचा कर्करोग होतो. अनुवांशिक घटक या रोगाच्या विकासास कारणीभूत ठरू शकतात.

(वाचा – दरवर्षी १० लाख महिलांचा जीव घेऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर, लॅन्सेटच्या अहवालात धक्कादायक खुलासा)

स्ट्रेनमुळे होतो    

तोंडाचा कर्करोग हा तरुणांसाठी चिंतेचा विषय नाही हा एक गैरसमज आहे. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) हा लैंगिक संक्रमिक व्हायरस आहे. त्याच्या काही प्रकारच्या स्ट्रेन मुळे तरुण लोकांमध्ये वाढत्या संख्येने तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे दिसतात. तोंडाच्या कर्करोगाशी लढण्यासाठी तरुणांनी सतर्क राहणे आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब लैंगिक संबंध ठेवताना करणे आवश्यक आहे.

(वाचा – Body Detox Drink | शरीराच्या कोपऱ्यातील जमा झालेली घाणही साफ करतील 4 ड्रिंक्स, डिटॉक्ससाठी करा सेवन)

प्रतिबंध अशक्य 

तोंडाचा कर्करोगास प्रतिबंध करणे अशक्य आहे हा देखील एक गैरसमज आहे. धुम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन टाळणे. आपल्या आहारात भाज्यांचा समावेश करणे. यामुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. सुरक्षित संभोगाने देखील एचपीव्ही संसर्गाचा धोका कमी होतो.

(वाचा – केकमधील ‘विषारी’ गोडव्याने झाला १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू, Artificial Sweetener मुळे कसे होते नुकसान)

कॅन्सर लक्षणांसह दिसतो 

तोंडाचा कर्करोग हा लक्षात येण्याजोग्या लक्षणांसह दिसून येतो हा देखील एक गैरसमज आहे. वास्तविकता तोंडाचा कर्करोग काहीवेळा प्रगत अवस्थेपर्यंत पोहोचेपर्यंत कोणतीही लक्षणे चटकन दिसून येत नाही. जीवनमान सुधारण्यासाठी तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे शोधण्यासाठी नियमित दंत तपासणी करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *