रिक्षा-टॅक्सी चालकांविरोधात आता करु शकता तक्राररिक्षा-टॅक्सी चालकांविरोधात आता करु शकता तक्रार

जवळचे भाडे नाकारणे, मीटरपेक्षा जास्त भाडे घेणे, गैरवर्तन करणे अशा मुजोर रिक्षा आणि टॅक्सीचालकांना आता चांगलाच धडा मिळणार आहे. कारण अशा परवानाधारकांची तक्रार थेट व्हॉटसॲपवरुन करता येणार आहे. अनेकदा कोणत्याही कारणांशिवाय परवानाधारक गैरवर्तन करताना दिसतात. त्यामुळे नागरिकांची फारच गैरसोय आणि अन्याय होतो. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. अशा काही परिस्थिती उद्धवल्यास 9152240303 या मोबाईल क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. Complaint Against Auto And Taxi Driver On whatsapp

या नव्या उपक्रमांतर्गत 31 जुलै पर्यंत परिवहन कार्यालयात 154 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील जास्त तक्रारी या रिक्षाचालकांच्या आहेत असे देखील दिसून आले आहे. यात प्रामुख्याने मीटरपेक्षा अधिक भाडे घेणे, प्रवाशांशी गैरवर्तन करणे अशा तक्रारी आहेत. तर यातील काही तक्रारी या भाडे नाकारण्यावरुनही करण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही ठोस कारणावरुन भाडे नाकारणे हे परवानाधारकांसाठी आता अधिक महागाचे ठरणार आहे. कारण यात दोषी सापडल्यास परवानाधारकांचा परवाना हा 15 दिवसांसाठी निलबिंत करण्यात आला आहे.

परवानाधारकांसोबत नागरिकांनाही अधिक जबाबदार वागावे लागणार आहे. कोणत्याही कारणाशिवाय तक्रार केल्यास तक्रारदरांना देखील अवगत करण्यात आलेले आहे. तक्रारदारांनी तक्रार केल्यानंतर त्यांनी केलेल्या तक्रारीच्या कार्यवाहीची माहिती व्हॉटसॲपच्या व ईमेल आयडीच्या महितीतून दिली जाणार आहे.

ईमेल द्वारे तक्रार नोंदवण्यासाठी mh03autotaxicomplaint@gmail.com या ईमेल आयडीवर करता येईल. असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पूर्व या कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.



    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *