देशात अनेक ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा लपून छपून सुरु आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये आजही अनेक तरुण या ड्रग्जच्या आहारी जाताना दिसत आहेत.या ड्रग्जवर रोख लागावी यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असतात. अशातच DRI च्या हाती ड्रग्ज पुरवणाऱ्या टोळीचा म्होरक्या हाती लागला आहे. त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नोएडामधून त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
ड्रग्जच सप्लाय करणारा हा म्होरक्या नायजेरिअन असून त्याची ओळख पोलिसांनी आधी विमानतळावर पकडण्यात आलेल्या एका सप्लायरकडून केली आहे. काहीच दिवसांपूर्वी पोलिसांनी विमानतळावरुन काही एकाला ड्रग्जसह पकडले होते. त्याच्याकडून या म्होरक्याची ओळख पटवण्यात आली होती. त्याच्यावर DRI लक्ष देऊन होती. मिळालेल्या माहितीनुसार हा म्होरक्या ड्रग्जसाठी पैसे आणि इतर काही गोष्टी पुरवत होता. तो सगळ्या गोष्टी नोएडामधून करत होता. त्याला पकडण्यात यश आले असून त्याच्याकडे अनेक सीमकार्डस, मोबाईल फोन आणि वेगवेगळ्या देशांचे पासपोर्ट मिळाले आहेत. त्याला अटक करुन सध्या मुंबईत आणण्यात आले आहे. तेथे त्याची अधिक चौकशी करण्यात येईल.