Narendra Modi सध्या आगामी निवडणुकांचे वारे वाहत आहे. सगळे पक्ष आपला जोर लावू पाहात आहे. सगळ्यांचीच चांगली पक्षबाजी सुरु आहे. यंदा कोणाचे सरकार येईल या कडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फेसबुकच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी आली आहे. इतकेच नाही तर धमकी देणारी ही व्यक्ती एका खास कारणासाठी धमकी देत आहे. पोलिसानी या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाय त्याला ताब्यात घेण्याची आल्याची देखील माहिती मिळत आहे.
केले लाईव्ह
तर ही घटना फेसबुकवर घडली असून कर्नाटकातील जेडी रसुल याने त्याचा फेसबुकवर लाईव्ह केले. त्याने लाईव्हमध्ये तलवार बाहेर काढून मोदींना धमकी दिली आहे. यात तो म्हणतोय की, जर यंदा केंद्रात काँग्रेसचे सरकार आले तर मोदींचा या तलवारीने खून करेन. अर्थातच हा जो कोणी आहे त्याला भाजपचे सरकार पुन्हा यावे असे वाटत आहे. परंतु अशी तलवार घेऊन आक्रमक होणे हे चांगले नाही. शिवाय सोशल मीडियावर असा मूर्खपणा खूपच भारी पडतो.
लोकांनी केली टीका
दुसरीकडे काही जण मात्र हा सगळा बीजेपीचा कांगावा असल्याचे बोलत आहे. कोणाला काहीही पडलेले नाही. मोदींना फक्त आपली लोकं किती बाजूने आहेत हे दाखवायचे आहे. अशा स्वरुपाच्या टीकाही होत आहे. हा सगळा बनाव असला तरी सध्या मात्र पोलिसांनी या व्यक्तीवर रितसर गुन्हा दाखल केला आहे.