Gold In Home भारतात सोन्याची किंमत ही खूपच अधिक आहे. सणासुदीच्या काळात किंवा लग्नसमारंभात आपण अगदी आवर्जून सोनं खरेदी करतो. सोन्याचे भावही आता आसमनाला टेकतील असे दिसून येते. म्हणूनच महिला आपल्या मुलांसाठी आणि भविष्याची तरतूद म्हणून सोनं खरेदी करतात. (GOLD) परंतु आता सोनं खरेदी करताना आणि ते घरात ठेवताना खूप विचार करा बरं का! कारण या पुढे तुम्हाला घरी सोनं ठेवताना खूप विचार करावा लागणार आहे. अन्यथा इन्कम टॅक्सची रेड तुमच्यावर पडू शकते. नेमकं किती सोनं तुमच्याकडे असलेलं चालू शकेल चला जाणून घेऊया या विषयी अधिक माहिती
विवाहीत आणि अविवाहीतांसाठी असणार वेगळे नियम
खूप जणांना आपल्याजवळ खूप सोनं बाळगण्याची सवय असते. परंतु आयकर विभागाने काही नवीन नियम जारी केलेले आहेत. त्यानुसार तुम्ही बाळगत असलेल्या सोन्याचा कर भरणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर तुम्ही जे सोनं खेरदी केलं आहे ते देखील किती असायला हवे याची देखील एक क्षमता जाहीर केलेली आहे. त्यानुसार महिला विवाहीत असेल तर तिला 500 ग्रॅम सोनं, अविवाहित महिलांना 250 ग्रॅम आणि पुरुषांना केवळ 100 ग्रॅम सोनंच आपल्यासोबत बाळगता येणार आहे. जर तुमच्याकडे अधिकचं सोन असेल तर तुम्हाला त्यावरील कर भरणा दाखवावा लागणार आहे.
जर तुम्ही सोनं हे हळुहळू बचत करुन घेतले असेल तर त्यावर कर लागणार नाही. परंतु त्याचा तसा पुरावा असणे गरजेचे आहे. शेती उत्पन्नातून देखील तुम्ही सोने घेतले असेल तरी त्यावर कर लागणार नाही. तसे पुरावे तुमच्याकडे असायला हवे.
आता घरी सोनं बाळगताना या गोष्टींचा विचार नक्की करायला हवा.