अंबरनाथ प्राचीन शिवमंदिरअंबरनाथ प्राचीन शिवमंदिर

Ambarnath Shiv Mandir अनेक पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. येथे भक्तांची कायम गर्दी असते. दर सोमवारी या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळते. हेमाडपंथी शिव मंदिर हे फार पुरातन आहे. यातील एक एक शिल्प किती जुने आहे याची साक्ष देते. परंतु या मंदिराकडे शासनाचे काही लक्ष नव्हते. कारण येथील अनेक शिल्पांना धक्के बसले असून ते तुटले आहे. आजुबाजूचा परिसरही म्हणावा इतका चांगला नाही. जर या मंदिराला पुरातन काळात महत्व असेल तर ते आता जतन करणे फारच गरजेचे आहे. परंतु निधीच्या अभावामुळे याकडे दुर्लक्ष होत होते. आता या पुढे तसे होणार नाही. कारण आता या ठिकाणी झीज थांबवण्याचे काम सुरु झाले आहे.

Ujjain Mahakaleshwar | वाचा उज्जैन महाकालेश्वरची कथा, अशी प्लॅन करा टूर 2024

निधी होता अपुरा

एखाद्या पुरातन शिल्पाची काळजी घेणे हे सोपे नसते. त्यासाठी बराच पैसा खर्च करावा लागतो. येथील अनेक शिल्प ही झीजू लागली आहेत. यांची झीज थांबण्यासाठी आता विशेष केमिकल असलेल्या सलाईनचा वापर केला जात आहे. जेणेकरुन भविष्यात या शिल्पाची झीज होणार नाही आणि याचे सौंदर्य अबाधित राहील. मंदिराच्या काळजीसोबत आजुबाजूचा परिसर देखील सुधारण्यात येणार आहे. त्यामुळे नक्कीच मंदिर परिसरही स्वच्छ राहील.

पांडवकालीन मंदिर

अंबरनाथमध्ये असलेले हे शिवमंदिर 963 वर्षे जुने आहे. हे मंदिर हेमांडपंथी असून ते राजा शिलाहार यांनी बनवले आहे. या मंदिराच्या परिसरात एक ओढा देखील आहे. आता येथे तुम्हाला आत गेल्यानंतर एक छोटे तलाव सदृश्य दिसेल.त्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हणतात. त्यालाच आम्रनाथ असे नाव आहे. त्यावरुनच या ठिकाणाला अंबरनाथ असे नाव पडले. अत्यंत कोरीव कामाचा उपयोग करुन हे मंदिर उभारण्यात आले आहे. शिल्पजडीत असे हे मंदिर त्याच्या स्थापत्यशैलीमुळे खूपच सुंदर दिसते.

आता तुम्ही या मंदिराला भेट दिली नसेल तर नक्कीच द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *