Anant Ambani Wedding ची सगळ्या सोशल मीडियावर चर्चा सुरु होत आहे. जगभरातून विविध व्यक्ती या लग्नसोहळ्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्यामुळे मुंबई सध्या चांगलीच गजबजलेली आहे. मुंबईतील खासगी विमानतळावर तर इतकी गर्दी आहे की, त्यात कोणीही सर्वसामान्य नाही तर त्यात बॉलिवूड सेलिब्रिटी आणि हॉलिवूड सेलिब्रिटी पाहायला मिळत आहे. नुकताच पॉप गायिका रिहानाचा एक व्हिडिओ पाहायला मिळाला त्यात तिने तिच्यासोबत आणलेलं बरंच सामान देखील दिसत आहे. तीन दिवस जामनगर येथे चालणाऱ्या या सोहळ्यात अजूनही काही खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
विविध गायक करणार सादरीकरण
जामनगर येथे लग्नाआधीचे काही खास कार्यक्रम होणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात रिहानाही सादरीकरण करणार आहे. इतकेच नाही तर याशिवाय अनेक गायक जसे मराठमोळे अजय- अतुल, दलजीत दोसांज, अरिजीस सिंह यांचा देखील समावेश असणार आहे. सध्या अनेक सेलिब्रिटी हे जामनगरला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. आता या सगळ्यांचे फोटोज आल्यानंतर तेथील त्यांचा लुक आपल्याला कळूू शकेल.
सोशल मीडियावर केवळ अंबानीच
आता सगळ्याच सोशल मीडियावर अंबानींच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. त्यांचेच फोटो सगळीकडे वायरल होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमांसाठी अंबानी यांनी तब्बल 1000 कोटींचा खर्च केला आहे. त्यामुळे यात किती राजेशाही थाट असेल याचा तुम्हाला अंदाज नक्कीच आला असेल.
आता या तीन दिवसांच्या कार्यक्रमात अजून काय काय होईल याचे अपडेट्स आम्ही Marathinewsflash मधून नक्कीच देऊ