Amruta Fadnvis यांचे नाव तर ग्लॅमरस दुनियेत अगदी आवर्जून घेतले जाते. परंतु त्यांच्यासोबत दिसलेली त्यांची लेक त्यांच्याहून अधिक सुंदर दिसते अशा प्रतिक्रिया सगळीकडे उमटू लागल्या आहेत. अनंत अंबानीच्या लग्नाच्या निमित्ताने सगळ्या सेलिब्रिटींना बोलावण्यात आले होते. अमृता फडणवीस या देखील यासाठी आमंत्रित होत्या. त्यांच्यासोबत त्यांची लेक दिविजा ही देखील होती. ते आताच्या एका नव्या व्हिडिओतून समोर आले आहे. पापाराझीने काढलेल्या दिविजाच्या फोटामुळेच तिची नव्याने ओळख सगळ्यांना झाली आहे.
पांढऱ्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली खूपच सुंदर | Amruta fadnavis

अमृता फडणवीस यांचा स्टाईल स्टेटमेंट थोडा वेगळा आहे. वेगवेगळ्या नव्या गोष्टी त्या ट्राय करतात. फॅशनच्या बाबतीत त्या अजिबात मागे नाहीत. आता त्यांची कन्या दिविजाही काही मागे नाही. ती सुंदर दिसते इतकेच नाही तर जर तिला लहानपणी पाहिले असेल तर आता तिचा हा लुक फारच वेगळा आहे. दिविजा लहान असताना चांगलीच गुटगुटीत होती. पण आता एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे ती फिट दिसते. शिवाय तिच्या ओव्हरऑल लुकमध्ये चांगलाच फरक दिसतोय. आता ही पूर्वीची दिविजा नक्कीच राहिलेली नाही. ती फारच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. त्यामुळेच पापाराझीलाही तिचा व्हिडिओ घेणे काही केल्या आवरले नसणार यात काही शंका नाही.
अप्रतिम ट्रान्सफॉर्मेशन

कोणाचेही ट्रान्सफॉर्मेशन पाहण्याची मजा एक वेगळीच असते. आजपर्यंत आपण अनेक सेलिब्रिटींचे असे बदल पाहिलेले आहेत. डाएट पासून ते त्यांच्या सर्जरीपर्यंत झालेले अनेक बदल चांगले आणि वाईट असे दोन्ही असतात. आता दिविजा फडणवीस हिचा हा मेकओव्हर तितकाच सुंदर आहे. कधी काळी गुटगुटीत असलेली ही लेक आता चांगलीच हॉट झाली आहे. ती जे परिधान करते ते ती उत्तम कॅरी करु लागली आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्यात चार चाँद लागले आहेत.
तु्म्हाला दिविजाचा लुक कसा वाटला नक्की कळवा.