Fruits Juice हा आरोग्यासाठी चांगला आहे असे आपण मानतो. परंतु त्या मागील सत्य जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? कारण फळांचा रस हा आरोग्यासाठी कितीही चांगला असला तरी त्याचे सेवन हे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही हा आजचा लेख नक्की वाचा आणि त्यानुसार फळांच्या रसाचे सेवन करायचे की नाही हे ठरवा. हे केवळ आम्ही सांगत नाही तर त्यामागे ही काही सायन्स आहे ते जाणून घेऊनच या विषयाची आज निवड केली आहे.
Fruits Juice म्हणजे काय?

आता आपण कधी ना कधी फळांचा रस नक्कीच प्यायला असेल किंवा आपल्यापैकी रोज ज्युस पिणारे लोक देखील हा लेख वाचत असतील. पण ज्यावेळी आपण फळांचा रस करतो. त्यावेळी एकाचवेळी साधारण ग्लासभर ज्युस निघण्यासाठी आपण पाच ते सहा फळांचा वापर करतो. त्यानंतर कुठे जाऊन एक ग्लासभर रस तयार होतो. या इतक्या फळांचे सेवन एकावेळी करणे म्हणजे शरीरात त्यातून किती साखर जाणे याचा तुम्हाला अंदाज येतो का? फळांचा रस करताना तुम्ही त्यामध्ये कदाचित साखर घालत नसाल परंतु फळांमध्ये जी आधीच साखऱ असते याचा कधी विचार केला आहात का?
जास्त साखर जास्त त्रास
काही जण केवळ फळांच्या डाएटवर राहतात किंवा ज्युस डाएटवर राहतात. त्यावेळी ते इतर काहीही खात नाही. म्हणून त्यांची साखर ही बॅलन्स होत असते. परंतु जर तुम्ही इतर गोष्टी खात असाल आणि त्यासोबतच तुम्ही असे फळाचे रस घेत असाल तर त्याचा त्रास तुम्हाला नक्कीच काही काळात जाणवू लागेल. सुरुवातीला कदाचित तुम्हाल फळांचे फायदे होत आहेत असे दिसेल. परंतु कालांतराने तुम्हाला साखर वाढणे, तोंड कोरडे पडणे, सतत तहान लागणे, आळस येणे, पिंपल्स, त्वचेच्या समस्या नक्कीच जाणवू लागतील.
रस घ्या प्रमाणात
कोणतीही गोष्ट प्रमाणात खाणे हे केव्हाही चांगलेच असते. जर तुम्ही रस अतिप्रमाणात घेतले तर त्याचा त्रास तुमच्या शरीराला हमखास होणार आहे यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे तुम्ही रस घ्यायचा असेल तर तो एक किंवा दोन फळांचा घ्या. तोही दिवसातून एकदा. शक्य असेल तर रस पिण्याऐवजी फळांचे सेवन करा. त्यामुळे तुम्हाला फायबरदेखील मिळते. त्यामुळे तुमच्या पोटांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत मिळते.
त्यामुळे आता कुठेही रस पिताना या गोष्टीची नक्की काळजी घ्या.