Maratha Aarakshan साठी जरांगे पाटील जालना येथे उपोषणाला बसले आहेत. गेल्या 6 दिवसांपासून ते उपोषणाला बसले आहेत. परंतु आता त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यासोतबत असलेल्या अनेकांनी त्याला उपोषण सोडण्यासाठी सांगितले तरी देखील ते ऐकायला तयार नाहीत. इतकेच नाही तर सलाईन लावण्यासाठीचीही विनंती करण्यात आली त्यासाठीही त्यांनी आरक्षणाची मागणी केली आहे. त्यांची प्रकृती जास्तच खालावल्यामुळे अखेर त्यांनी पत्रकाराच्या हातून पाणी प्यायले आहेत. परंतु अजूनही त्यांची प्रकृती अस्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
त्यांची प्रकृती सतत ढासळत असूनही त्यांनी आरक्षणाचा हट्ट काही सोडलेला दिसत नाही. आधी आरक्षण द्या या मागणीवर ठाम राहून त्यांनी हे उपोषण केले आहे. त्यांना अनेकदा अशक्तपणामुळे ग्लानी येत आहे.बुधवारी त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. हे असेच सुरु राहिले तर त्यांची प्रकृती अधिक खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जरांगे पाटील यांना मराठी समाजाचा मोठा पाठिंबा आहे. त्यांची आरक्षणाची मागणी रास्त असली तरी सध्यस्थितीत त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे फारच महत्वाचे आहे.