GSTGST

आपल्या देशात 2017 पासून विविध गोष्टींवर GST आकारला जाऊ लागला आहे. काही ठराविक गोष्टींवर आणि सुविधावर आपल्याला तो भरावा लागतो. शॉपिंग असो वा खाणे-पिणे सगळ्यांवरच हा कर आकारण्यात येतो. परंतु काही ठिकाणी हल्ली GST च्या नावाने फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. कारण GST हा आपण व्यापाऱ्यांना देत असतो. त्यांच्याकडून तो पुढे सरकारला भरला जातो. कधीकधी असे दिसून आले आहे की, काही ठिकाणी गरज नसताना देखील GST आकारला गेला आहे. अशावेळी तुमची फसवणूक टाळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया तुम्हाला या संदर्भात नेमकी कोणती माहिती असायला हवी ते.

यांना नाही GST घेण्याचा अधिकार

सरकारने छोट्या व्यापाऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी त्यांना कंपोझिशन स्किमचा लाभ घेण्यास सांगितले आहे. अशा व्यापाऱ्यांना GST घेण्याचा अधिकार नाही. अशा कंपोझिशन व्यापाऱ्यांना त्यांच्या खिशातून कराची रक्कम भरायची असते. ज्यांची उलाढाल ही 1.50 कोंटीपेक्षा कमी आहे आणि जे इतर कोणत्याही राज्यांमध्ये आपला व्यवसाय करत नाही अशांना कोणत्याही पावत्या सादर करण्याची गरज नाही. त्यांना 1 टक्क्यांपासून ते 6 टक्क्यांपर्यंत कर भरावा लागतो. पण ते लोकांकडून कर घेऊ शकत नाही.

तुम्ही कर भरायला हवा की नको

आता कोणतीही सेवा घेतल्यानंतर तुम्ही कर भरायला हवा की नाही हे तुम्हाला स्वत:ला तपासता येऊ शकते. https://www.gst.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला हे तपासता येऊ शकते. यामध्ये search taxpayer मध्ये जाऊन तुम्हाला त्याने बिलावर टाकलेला जीएटी नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यामुळे तुम्हाला तो व्यापारी टॅक्सचा फायदा घेतोय का? हे कळेल.

आता कोणत्याही ठिकाणी टॅक्स भरताना एकदा तरी या गोष्टीचा विचार नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *