थंडीत केसांना होणारा एक हमखास त्रास म्हणजे कोंडा (Dandruff). खूप जणांना वरेचवर सतत कोंडा होत असतो. तर काही जणांना थंडी सुरु झाली की, सुरकुतणाऱ्या त्वचेसोबतच स्काल्पही सुकल्यामुळे कोंड्याचा त्रास होतो. कोंड्याची ही समस्या अन्य काही गोष्टींसाठीही तितकीच हानिकारक असते हे तुम्हाला माहीत आहे का? त्यामुळे कोंडा झाल्यानंतर त्यावर योग्यवेळी आणि योग्य असा उपचार घेणे फारच जास्त गरजेचे असते. अशा या जिद्दी कोंड्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्यात ते आता आपण जाणून घेऊया.
कोंड्याचा प्रकार
कोंडा हा अनेकांना वेगवेगळा होत असतो. म्हणजे काही जणांना कोंडा हा केवळ खाजवल्यावरच वर येतो. तर काही जणांचा कोंडा क्राऊन भागात चिकटलेला असतो. जरा कंगवा किंवा खाजवले की कोंडा बाहेर येतो. त्यातच जर तुम्ही केसांची स्वच्छता केली नसेल तर अशावेळी केसांना वासही येऊ लागतो. तुम्हाला कोंडा सीझननुसार झाला असेल तर अशावेळी तुम्हाला त्यासाठी काही विशेष शॅम्पू दिले जातात. त्यांच्या दोन-चार वापरानंतर तुमच्या स्कल्पमध्ये फरक पडू लागतो. जर सतत स्काल्पला खाजवून जखम झाली असेल तर ते बरे होण्यासही मदत मिळते.

घरगुती उपचार टाळा
काही जण कोंडा झाल्यानंतर घरीच काही उपचार करण्यास सुरुवात करतात. घरगुती उपचार वाईट आहेत असे आमचे अजिबात म्हणणे नाही. परंतु कधीकधी घरगुती उपचार करताना आपल्याला कारण माहीत नसताना काही गोष्टी लावल्या जातात. त्यामुळे कोंडा कमी होण्याऐवजी जास्त होत राहतो. त्यामुळे कोंडा सतत होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतल्याशिवाय काहीही लावू नका.
गरम पाण्याचा वापर नको
थंडीच्या दिवसात गरम पाणी शरीराला आल्हाददायक वाटते. परंतु त्याच कडकडीत गरम पाण्याने जर आपण केस धुतले तर मात्र त्यामुळे केसांच्या मुळांना गरम पाणी लागून तेथील नैसर्गिक तेलग्रंथी कमी होतात. त्यामुळे स्काल्प सुकून त्याव कोंडा होण्याची शक्यता अधिक होत राहते. तुम्ही जितक्या वेळा केस गरम पाण्याने धुत राहाल तुमचे केस तेवढेच अधिक रुक्ष होत राहतील आणि तुमच्या केसांमध्ये कोंडा होईल.
त्वचेची समस्या असेल तर आधी केस तपासा
त्वचेची कोणतीही समस्या असेल तर त्याचे मुख्य कारण जसे आतून असते.अगदी त्याच प्रमाणे बाहेरुनही असते. तुमचे केस जितके अस्वच्छ असतील तितका तुम्हाला त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे सगळ्यात आधी केसांची स्वच्छता ही महत्वाची. तुम्हाला रोज केस धुणे शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातून दोन-तीनवेळा केस धुणे गरजेचे आहे. कंडिशनर आणि शॅम्पू निवडताना तो योग्य आहे की नाही ते जाणून घ्या. म्हणजे तुम्हाला केसांमध्ये होणारा कोंडा सतत होणार नाही.
आता थंडीतील कोंडा कमी करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.