शनीची इडा पिडा कोणालाही नको असतो. कारण शनिची साडेसाती ज्याच्या मागे लागते त्याला अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. परंतु यंदाच्या वर्षी शनि काहींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. त्यांनी घेतलेल्या अनेक कामांना यंदा चांगले यश मिळणार आहे. या राशींनी यंदा थोडीशी जास्त मेहनत घेतली तर त्यांना यश हमखास मिळणार आहे. शनिची कृपा ही अत्यंत शुभ मानली जाते. तर शनिची वर्कदृष्टी ही खूप काही घेऊन जाते. चला जाणून घेेऊया यंदा कोणत्या राशीवर शनिची कृपा राहणार आहे ते.
मेष (Shani 2024)
मेष राशीसाठी गेला काही काळ हा खूपच मेहनतीचा पण फळ न मिळणारा गेला आहे. परंतु यंदाच्या वर्षी त्यांना चांगले यश मिळणारा असणारा आहे. तुमच्या कामांना चांगला प्रतिसाद मिळणार असून तुमच्या मेहनतीला यश मिळणार आहे. तुमचे एखादे काम राहून गेले असेल तर यंदाच्या वर्षी ते काम मार्गी लागणार आहे. त्यामुळे जे करताय त्यात प्रयत्न करत राहा तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. जे चांगल्या कामाच्या शोधात असतील त्यांनाही उत्तम काम मिळणार आहे. कामासाठी काही सहलींचे नियोजन होऊ शकते. दर शनिवारी बजरंग बाणाचे पठण करणे फायद्याचे ठरेल.
तुळ
तूळ राशीसाठीही गेली काही वर्षे नुकसान देणारी ठरली आहेत. विविध कारणांमुळे त्यांचे लहान सहान नुकसान झाले आहे. यंदा तुळ राशीच्या जातकांना संतती सुख प्राप्त होऊ शकते. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळू शकते. एखादा नवा उद्योग विचारात असेल तर त्यात यश मिळू शकते. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. एखाद्या कामामधील सातत्य अजिबात सोडू नका. उपाय म्हणून शनिवारी काळे हरभरे खा.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी यंदाचे वर्ष हे अधिक चांगले जाणार आहे. त्यांना त्यांच्या उद्योगात अधिक यश मिळणार आहे. व्यवसाय करत असाल तर तुम्हाला अधिक यश मिळणार आहे. व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर त्यावरही काम सुरु करा.एखादी बिझनेस ट्रिप फलदायी ठरणार आहे. दर शनिवारी काळे कपडे दान केल्याने तुम्हाला फायदा मिळण्यास मदत मिळेल.
मीन
मीन राशीच्या लोकांनाही शनिचा फायदा होणार आहे. परंतु असे असले तरी तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. परदेशात जाण्याची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकते. कामांच्या व्यापात आरोग्याची काळजी घ्या. दर शनिवारी काळे तीळ पाण्यात वाहा.