मराठा आरक्षणाला एकमताने मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे समस्त मराठा समाज हा आनंदात आहे. पण आरक्षण देताना इतर आरक्षणकर्त्यांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी अनेकांनी आपली मते मांडली होती. धनगर आरक्षणासाठी सतत झटणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मराठा आरक्षणाला मान्यता मिळाल्यानंतर आनंद साजरा केला आहे. त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न देता मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल त्यांनी ढोल वाजवून आनंद व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी एक ट्विट देखील केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे इतर समाजातील वर्गाला त्याचे नुकसान होईल अशी भिती इतर समाजातील लोकांना वाटत होती. त्यामुळे अनेकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला नव्हता. परंतु एकमताने आरक्षणाला मंजुरी देताना ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का दिलेला नाही, याचे आभार आमदार गोपीचंद पडळकर यांनी मानले आहे. त्या संदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केले आहे. असे करताना त्यांनी मराठा समाजाचेही आभार मानले आहे.