Makar Sankrant 2024 येत्या 15 तारखेला या वर्षाचा पहिला सण मकरसंक्रात आपण सगळे साजरा करणार आहोत. या आधी आपण मकरसंक्रातीची माहिती जाणून घेतली आहे. दरवर्षी संक्रांतीचे काही नियम हे बदलत असतात. त्यातील अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे काळे वस्त्र, हा एकमेव असा सण आहे ज्या दिवशी काळे कपडे घालणे अत्यंत पवित्र असे मानले जाते. याला शास्त्रीय कारण असल्यामुळे या दिवशी लहान मुलांपासून ते स्त्रिया काळे कपडे परिधान करतात. परंतु यंदाच्या वर्षी काळे कपडे घालता येणार नाही. काळा रंग यंदा वर्ज्य करण्यात आला आहे. पण यामागे काय आहे कारण चला घेऊया जाणून
20 + Makar Sankranti Wishes | मकरसंक्रातीच्या शुभेच्छा
या कारणासाठी घालू नका काळे कपडे

संक्रांत देवी ज्या गोष्टीवर बसून येते. ती गोष्ट ही त्या काळासाठी शुभ मानली जात नाही. तिने धारण केलेल्या त्या गोष्टी आपण धारण करणे हे शुभ मानले जात नाही. यंदा संक्रात ही काळे कपडे घालून आली आहे. त्यामुळे तिने घातलेले काळ्या रंगाचे कपडे आपण घालू शकत नाही. परंतु एक रंगाची यादी जी यंदाच्या या काळात अगदी शुभ सांगितली आहे ती म्हणजे लाल,गुलाबी, पिवळा, निळा, केशरी हा रंग तुम्ही या संक्रातीला परिधान करु शकता. त्यामुळे यंदा जर तुम्ही काळी साडी घेणार असाल किंवा नेसण्याचा विचार करत असाल तर ती घेऊ नका. कारण काळा रंग हा यंदा अजिबात शुभ मानला जाणारा नाही. एरव्ही काळा रंग हा संक्रातीच्या काळात शुभ मानला जातो. कारण या काळात होणारे उत्तरायण, वाढणारी थंडी आणि शरीरात उष्णता शोषून घेण्यासाठी काळ्या रंगाचे कपडे हे अधिक चांगले मानले जातात.
Makarsankrant 2024 | Bornhan | तुमच्या बाळाचे आवर्जून घाला ‘बोरन्हाण’
घालू शकता हलव्याचे दागिने
काळे कपडे जरी परिधान केले नाही तरी देखील तुम्हाला हलव्याचे दागिने घालता येतील. यंदा आलेले रंग हे गडद आहेत त्यावर अनेक गोष्टी उठून दिसणाऱ्या आहेत त्यामुळे तुम्हाला हलव्याच्या दागिन्यांची स्टाईल नक्कीच करता येईल. काही गोष्टींमध्ये असलेले शास्त्र पाळणे हे गरजेचे असते. काळा रंग नवविवाहितेला जर परिधान करायचा असेल तर तिने संक्रातीचे दिवस टाळून मग परिधान केले तरी चालतील. परंतु संक्रातींच्या तीन दिवसांच्या काळात तुम्ही ते न घालणे केव्हाही चांगलेच
आता कोणत्या कारणासाठी तुम्हाला काळा रंग नेसायचा नाही हे कळलं असेलच. आता ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.