नॉर्थ ईस्ट अर्थात ईशान्य मुंबईचे उमेदवार असणारे मिहीर कोटेचा याच्या प्रचाराच्या रॅलीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात रितसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली असून, ‘काल माझी मानखुर्दमधून प्रचार रॅली सुरू असताना परत एकदा संजय पाटलांच्या ‘टोपीवाल्या गुंडांनी ‘ मला इजा पोहचवण्याचे उद्देशाने माझ्यावर दगड भिरकवला पण दुर्दैवाने माझ्या भगिनी भाजपाच्या कार्यकर्त्या निहारिका प्रकाशचंद्र खोंदले यांना मानेवरती दगड लागला आणि मार बसला आहे.’ असे मिहीर कोटेचा यांनी सांगितले आहे.
(वाचा – Ujjwal Nikam | पूनम महाजनांचा पत्ता कट, उत्तर मध्य मुंबईत उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर)
संजय पाटलांवर निशाणा
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत संजय पाटील यांच्यावर मिहीर कोटेचा यांनी निशाणा साधलाय. तर सध्या मानखुर्द क्षेत्राला संजय पाटील हे मिनी पाकिस्तान बनवत असून ते कदापी होऊ देणार नाही. तर १ मे रोजी मानखुर्दमध्ये येणार असल्याचे खुलेआम आव्हान त्यांनी यावेळी दिलंय.
(वाचा – South Mumbai Seat | हिंदुत्त्ववादी चेहऱ्याला मिळेल पसंती, दक्षिण मुंबईत राजकीय समीकरणाचा बदल)
हिंंमत असेल तर…
१ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी परत एकदा खुलेआम मानखुर्दमधे येणार आहे. हिंमत असेल तर यावेळेस मात्र निशाणा चुकवू नका. समोरून वार करा पाठीमागून नाही असे आव्हान यावेळी संजय पाटलांना निशाणा साधत मिहीर कोटेचा यांनी दिलंय.
(वाचा – Breaking: Mukesh Dalal | लोकसभा निवडणुकीत उघडले भाजपचे खाते, सुरतचे उमेदवार बिनविरोध विजयी)