अमृता ट्रोलर्सचा करतात सामनाअमृता ट्रोलर्सचा करतात सामना

Amruta Fadnavis हे नाव केवळ राज्याच्या राजकारणीशी जोडले आहे असा विचार करत असाल तर असे अजिबात नाही. कारण अमृता फडणवीस यांनी त्यांच्या कलागुणांनी स्वत:च्या नावाचाच एक ब्रँड तयार केला आहे. त्यांना ओळखीसाठी अन्य कोणाच्या नावाची गरज घ्यावी लागत नाही तर त्या त्यांना जसं आवडतं तशाच राहतात. सोशल मीडियाच्या या काळात अनेक जण त्यांना ट्रोलदेखील करतात. परंतु अमृता फडणवीस यांच्यावर त्याचा काडीमात्र परिणाम झालेला दिसत नाही. त्याकधीही त्यामुळे थांबल्या आहेत असे दिसून येत नाही. ज्या काम त्या आधी करत होत्या ते आता देखील करतात. जी फॅशन त्यांना आवडत होती. त्या आजही त्या कॅरी करतात.

नाहीत नुसत्या मिसेस मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी म्हणून त्यांना सुरुवातीला अनेकांनी ओळखले असेल तरी बँकीगच्या क्षेत्रात त्यांनी कित्येक वर्ष करिअर केलेले आहे. त्यामुळे त्या आधीही करिअर ओरिएंटेट होत्या असे म्हणायला हरकत नाही. आज त्यांना त्यांच्या सोशल मीडियाच्या दिसण्यावरुन खूप वेळा ट्रोल केलं जातं. पण त्या ट्रोलर्सना त्यांनी कधीही आपला वीक पॉईंट होऊ दिलेला नाही. त्या त्यांची ओळख आजही टिकून आहेत. त्यामुळे त्या नुसत्या मिसेस मुख्यमंत्री आहेत असे म्हणून चालणार नाहीत. कारण त्या बँकीग क्षेत्रासोबत संगीत आणि ग्लॅमरच्या दुनियेतही आपली छाप उमटू पाहात आहेत.

गाण्यावरुनही केले जाते ट्रोल

अमृता फडणवीस यांना गाण्याची आवड आहे. त्या गातात, गाण्याचे शो करतात, गाण्याच्या म्युझिक अल्बममध्येही त्या काम करतात. त्यांचा आवाज ही सध्या त्यांची ओळख आहे. परंतु त्यावरुनही त्यांना ट्रोल केले जाते. या ट्रोलमध्ये अनेकदा गाणं बंद करा असा सल्ला दिलेला असतो. पण अमृताजी हा सगळा सल्ला नेहमीच सकारात्मक घेत असाव्यात याचे कारण त्या गाण्यामध्ये कायम प्रगती करताना दिसल्या आहेत. त्यांचे सुरुवातीचे व्हिडिओ आणि आताचे व्हिडिओ पाहिले तर त्यातील फरक तुम्हाला नक्कीच कळून येईल. त्यांनी त्यांच्या गाण्यात बरेच परिश्रम घेतलेले दिसतात. ओळखीच्या बळावर तुम्हाला एखादे काम मिळू शकते. पण त्यात टिकून राहण्यासाठी तुम्हाला केवळ टॅलेंट असणेच गरजेचे असते. अमृृता फडणवीसमध्ये हे टॅलेंट आहे म्हणूनच त्या आजही या क्षेत्रात तितक्याच विश्वासाने टिकून आहेत.

फॅशन ही अगदी मनासारखी

अमृता फडणवीस यांना त्यांच्या कपड्यावरुन ट्रोल केले जाते. परंतु आपल्या आवडीचे कपडे घालणे हे सर्वस्वी आपला अधिकार आहे. जर एखाद्याला एखादी फॅशन आवडत असेल तर त्यामध्ये गैर असे काही नाही. जर आपल्याला आपल्या आवडीनिवडीचे स्वातंत्र्य आहे. तर तो सेलिब्रिटीलाही आहे. अगदी त्याच प्रमाणे आपल्याला हवी असलेली फॅशन ते अगदी सहज कॅरी करतात. तयात त्यांना कोणी कितीही ट्रोल केले तरीही त्यांना फारसा फरक पडताना दिसत नाही.

प्लास्टिक सर्जरीवरुन केले जाते ट्रोल

प्रत्येक सेलिब्रिटी हे सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट आणि सर्जरी करतात. काहींची सर्जरी ही त्यांना अगदी सुंदर दिसते. तर काहींना आधी तुम्ही वेगळे आणि नंतर वेगळे असे पाहिल्यामुळे त्यांच्यातील बदल टिपणे शक्य असते. अमृताजींनी काही प्लास्टिक सर्जरी केल्या असतील तर त्या लपून नाहीत. त्यांनी त्याबद्दल काहीही म्हटलेले देखील नाही. तरीही आजही त्यांच्या चेहऱ्याच्या बदलावरुन खूप जण त्यांना ट्रोल करताना दिसतात. त्यांच्या सोशल मीडियाच्या खाली त्यांच्यावर असंख्या निगेटिव्ह अशा कमेंट असतात पण त्याकडे त्यांनी फारसे काही लक्ष दिलेले नाही हे तितकेच खरे आहे. त्यांनी त्यांच्या कोणत्याही पोस्ट कमी केल्यात किंवा सोशल मीडियावर पोस्ट करणे कमी केले असेही झालेले नाही.

एकूणच तुमचा आत्मविश्वास हा तुमच्यासाठी सगळे काही असतो हे अमृताजींकडून शिकण्यासारखे आहे. सोशल मीडियाच्या या काळात अनेक जण नकारात्मक कमेंट दिल्या की नैराश्याच्या गर्तेत जातात पण अमृताजी मात्र आजही आपल्यावर विश्वास ठेवत ठाम पुढे वाटचाल करत आहेत. यात काही शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *