आजच्या बदलत्या लाईफस्टाईल, प्रदूषणामुळे केसांना अजिबात योग्य पोषण मिळत नाही. त्यामुळे अगदी तरूण वयात केस सफेद होणे, केसगळती, केसांचे तुटणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. बीट आणि कडिपत्त्याची चव तर सर्वांनाच माहीत आहे. हे दोन्ही पदार्थ केसांना उत्तम पोषण देते आणि आपले केस हेल्दी राखण्यास मदत करतात. याचा कसा वापर करून घ्यावा हे या लेखातून आम्ही देत आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
कडीपत्ता आणि बीटमधील गुण

कडिपत्ता आणि बीटमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. या दोन्ही पदार्थांमध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फोरस आणि निकोटिनिक अॅसिड्स भरपूर असून केसांच्या समस्या उदाहरणार्थ कोंडा, केसगळती, कोरडे केस आणि फ्रिजी हेअरपासून सुटका मिळवून देते. या लेखाद्वारे आपण कडिपत्ता आणि बिटाचा DIY हेअर मास्क कसा बनवायचा याची सोपी पद्धत जाणून घेऊया.
(वाचा – Dandruff | थंडीत केसांमधील कोरड्या कोंड्याने हैराण आहात, मग एकदा वाचा)
साहित्य
- कडिपत्त्याची १०-१२ पाने
- १ लहान बीट
- १ मोठा चमचा नारळाचे तेल
(वाचा – Henna Application | केसांना मेंदी लावणे चांगले की वाईट, वाचा ही माहिती)
बनविण्याची पद्धत

- हेअरमास्क बनविण्यासाठी सर्वात पहिले कडिपत्ता आणि बीटाचे लहान लहान तुकडे करून घ्या
- त्यानंतर कडिपत्ता आणि बीट ब्लेंडरमध्ये घालून स्मूथ पेस्ट बनवा
- हे मिश्रण बाऊलमध्ये काढा आणि त्यात १ चमचा नारळाचे तेल मिक्स करून घ्या
- आता हे तयार केलेले मिश्रण केसांना आणि स्काल्पवर हलक्या हाताने लावा आणि मालिश करा
- त्यानंतर शॉवर कॅपने केस झाका आणि हा हेअर मास्क साधारण ३० मिनिट्स तसाच राहू द्या
- अर्ध्या तासाने केस थंड पाण्याने धुवा आणि साफ करा
काय होतो परिणाम

कडिपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्व आढळतात जे केसांना अधिक मजबूती देतात. इतकंच नाही तर केसगळती थांबविण्यासाठी याचा उपयोग होतो आणि केसांची चांगली घनदाट वाढ होते. तर बिटामध्ये विटामिन आणि खनिजांनी युक्त असून स्काल्पला अधिक चांगले पोषण मिळवून देते. या हेअरमास्कमध्ये असणाऱ्या नारळाच्या तेलाचा केस हायड्रेटेड ठेवण्यास आणि मॉईस्चराईज राखण्यास मदत मिळते.
टीपः या लेखात देण्यात आलेली सर्व माहिती आणि सूचना सामान्य माहितीवरून देण्यात आली असून Marathi News Flash याबाबत कोणतीही पुष्टी देत नाही. कोणत्याही गोष्टीचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.