Diabetes असणाऱ्या रुग्णांना खानपान सवयींकडे फारच लक्ष द्यावे लागते. आपल्या रोजच्या आहारात काही गोष्टी समाविष्ट केल्या तर डाएबिटीस नियंत्रणात ठेवण्यास आपल्याला नक्कीच मदत मिळते. आपल्या स्वयंकपाकघरात असणारे मेथीचे दाणे हे मधुमेहींसाठी फारच फायद्याचे ठरतात. त्याच्या सेवनामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते, असे अभ्यासांती सिद्ध झाले आहे. परंतु आहारात कोणत्याही गोष्टींचा समावेश करण्याआधी तुमच्या डॉक्टरांकडून त्यासंदर्भात एक योग्य सल्ला घेणे फारच गरजेचे आहे. आज आपण मेथी दाण्याचा उपयोग (Fenugreek Seeds) चा उपयोग कसा करायचा या विषयी अधिक माहिती घेणार आहोत.
मेथी दाणे Diabetes ठेवते नियंत्रणात

- मेथीच्या दाण्यामध्ये असलेले सोल्युबल फायबर हे कार्बोहायड्रेट आणि साखर यांचे संतुलन राखते. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
- इन्शुलिनचे प्रमाण योग्य ठेवण्यासही मेथीचे दाणे फायद्याचे असतात असे अभ्यांती सिद्ध झालेले आहे.
- जेवणानंतर रक्तातील साखर वाढते. पण जेवणानंतर जर तुम्ही मेथीचे दाणे घेतले तर त्यामुळे जेवणानंतरची साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
- शरीरात तयार होणाऱ्या इन्शुलिनसाठी आवश्यक असे बेटा सेल्स यांचे संरक्षण करण्यास मेथीचे दाणे मदत करते.
- ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस शरीरात वाढला की त्यामुळेही अनेकांना मधुमेहाचा त्रास होतो. या स्ट्रेसला नियंत्रित करण्याचे काम मेथीचे दाणे करते असे देखील निदर्शनास आले आहे.
Diabetes नियंत्रणात ठेवण्यासाठी असा करा मेथीच्या दाण्याचा वापर
- मेथी दाणे आदल्या रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी ते पाणी गरम करुन चहासारखे प्या. असे देखील मेथीदाण्याचे सेवन करता येऊ शकते.
- मेथी दाण्याची पावडर करुन ती तुम्ही पित असलेल्या स्मुदी किंवा रसांमध्ये देखील घालून प्यायले तरी देखील चालू शकते.
- एखाद्या खाद्यपदार्थात मेथी दाण्याची पावडर घातल्याने तुम्हाला फायदा मिळण्यास मदत मिळते.
- हल्ली बाजारात मेथीचा अर्क असलेल्या काही सप्लिमेंट मिळतात. त्या योग्य सल्ल्यानिशी तुम्ही घेऊ शकता.
- मेथी पेरुन त्यातून उगवलेले गवत देखील तुम्ही खाऊ शकता. त्यामुळेही तुमच्या पोटात मेथी जाऊ शकते.
अशाप्रकारे मेथी दाण्याचे सेवन करुन Diabetes नियंत्रणात आणू शकता. परंतु कोणत्याही गोष्टी करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले.