Central Railway | मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी ही अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे. कारण उद्यापासून मध्य रेल्वेच्या 8 स्थानकांवर एक्सप्रेस गाड्या थांबणार आहेत. प्रायोगिक तत्वावर या स्थानकांवर गाड्या थांबवण्यात येणार असून यात कर्जत, लोणावळा, भिगवण,रोहा, पनवेल,संगमेश्वर रोड, सातारा आणि मसूर या स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे या स्थानंकावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
सातारा रेल्वे स्थानकावर आता हुबळी दादर एक्स्प्रेसला तीन मिनिटांसाठी थांबणार आहे. भिगवण स्थानकावर दादर पंढरपूर एक्स्प्रेसला दोन मिनिटांसाठी थांबा घेणार आहे. कर्जत स्थानकावर डेक्कन एक्स्प्रेसला दोन मिनिटे तर नांदेड पनवेल एक्स्प्रेसला एक मिनिट थांबा राहणार आहे. लोणावळा स्थानकावर दादर पंढरपूर एक्स्प्रेस, दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस, हुबळी दादर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, विशाखापत्तनम-एलटीटी एक्स्प्रेस यांना थांबे देण्यात आले आहेत. रोहा स्थानकावर तिरुवनंतपुरम-एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाड़ी एक्स्प्रेस यांना थांबे दिले आहेत. पनवेल स्थानकावर एलटीटी-एर्नाकुलम दुरंतो एक्स्प्रेस एक मिनिटे थांबा देण्यात आला आहे. या नवीन थांब्याचा निर्णयाची २५ ऑगस्टपासून अंमलबजावणी होणार आहे. ज्या गाड्या आधी कधीही या स्थानकांवर थांबल्या नव्हत्या त्या आता प्रायोगिक तत्वावर या स्थानकात थांबणार आहे. याचा लाभ अधिकाधिक प्रवाशांनी घ्याव्यात अशी सूचना मध्य रेल्वेने केली आहे.