महागाईने उच्चांक गाठला आहे. जेवणात रोजच्या रोज लागणारा कांदा हा दरवर्षी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणतो. पण या वर्षी कांद्याचा वांदा होणार अनेकांना जेवणातून कांदा कमी करण्याची वेळ येणार आहे. गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पादन हे फारच कमी झालेले आहे. सगळ्यात जास्त कांद्याचे उत्पादन घेणारा देश असूनही यंदा कांद्याचे कमी उत्पादन निर्यातीवरही परिणाम करणार आहे.
कांदा अनुदानासाठी ज्या जिल्ह्यांनी 10 कोटींच्या आत मागणी केली आहे. अशा जिल्ह्यांना 100 टक्के अनुदान देण्यात आले आहे. तर ज्या जिल्ह्यांची मागणी ही 10 कोटींहून अधिक आहे त्यांना हे अनुदान 53.94 टक्के इतके देण्यात आले आहे. सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने कांदा खरेदीबाबतचा हा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे देशात यंदा केवळ 0.46 हेक्टरवर 6.05 लाख मेट्रिक टन इतके उत्पादन घेण्यात आलेले आहे. गेल्या 5 वर्षात कांद्याचे उत्पादन हे 100 मॅट्रिक टनच्या पुढील आहे. पण यावर्षी ते फारच कमी असल्याचे दिसत आहे.
कमी उत्पादनाचा परिणाम हा नक्कीच कांद्याचा तुटवडा निर्माण करणार आहे यात काहीही शंका नाही.
राज्यातील कामगारांना लाभदायक ठरणार ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना’