Waxing Tips

वॅक्सिंग करून घेण्यासाठी पार्लरमध्ये अनेकदा महिला जाते. काही महिला इतक्या व्यस्त असतात की ते घरी करून आपला वेळ वाया घालवू इच्छित नाहीत, परंतु काही महिला अशा आहेत ज्या घरीच वॅक्सिंग करतात. जर तुम्ही स्वतः घरी वॅक्सिंग करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. कारण अनेकदा घरी वॅक्सिंग केल्यास त्वचा काळवंडल्याचे अधिक दिसून येते. त्यामुळे तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा. (फोटो सौजन्य – iStock) 

वॅक्सिंगचे टेंपरेचर 

तुम्ही घरच्या घरीही वॅक्सिंग करू शकता, पण ते करताना काळजी घ्यावी लागेल, अन्यथा त्वचेला इजा होऊ शकते. नको असलेले केस काढण्यासाठी लोक शेव्हिंग, हेअर रिमूव्हल क्रीम आणि इतर अनेक गोष्टी वापरतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, घरी वॅक्सिंग करताना वॅक्सचे तापमान अगदी योग्य असावे, अन्यथा त्वचा जळू शकते.

(वाचा – Summer Skin Care | या Heat Wave मध्ये त्वचेची घ्या दह्याचा वापर करून काळजी, ४ कारणे महत्त्वाची)

नेहमी जाड थर लावणे  

वॅक्सिंग करताना किंवा त्यापूर्वी काही खास गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि त्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात. वॅक्सिंग करताना अनेक जण पातळ थर लावतात, जे अजिबात योग्य नाही. आपण नेहमी जाड थर लावावा. यामुळे त्वचेवरील केस लवकर आणि व्यवस्थित निघण्यास मदत मिळते. 

(वाचा – Skin Glow With Pranayama 2024 | चेहरा चमकेल, रोज करा ‘प्राणायम’)

स्ट्रिप्स काढण्याची पद्धत 

अनेक महिलांना वॅक्सिंगचा करताना त्रास होतो. अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या वॅक्सिंगचा त्रास टाळण्यासाठी पट्टी अतिशय हळूवारपणे ओढतात. मात्र तुम्ही ही चूक अजिबात करू नका. तुम्हाला असे करताना जास्त वेदना जाणवू शकतात आणि असे केल्याने तुम्ही तुमचे शरीरावरील केस नीट काढता येणार नाही. पटकन ओढून स्ट्रिप काढावी जेणेकरून कमी त्रास होईल. 

जखमेवर वॅक्स लावणे चुकीचे 

वॅक्सिंग करताना अनेक चुका होतात ज्यामुळे त्वचा पूर्णपणे खराब होते. शरीरावर एखादी जखम झाली असेल तर त्यावर कधीही मेण लावू नये. तिथे वॅक्सिंग करण्याची चूक अजिबात करू नये. पट्टी खेचताना, जखमांवर किंवा कापलेल्या भागांवर लावू नका कारण त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

मॉईस्चराईजर लावावे 

शरीरावरील नको असलेले केस काढून टाकणे सोपे आहे, परंतु जर आपण काही चुका केल्या तर नुकसान खूप मोठे होऊ शकते. नीट वॅक्सिंग केल्यानंतर ते पाण्याने धुवा आणि त्यावर मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यास मदत मिळते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *