साबण आणि बॉडी वॉशच्या या काळात खूपच कमी जणं असतील जी नित्य आंघोळीसाठी उटण्याचा वापर करत असतील. पूर्वीच्या काळी या सगळ्या गोष्टी नसताना त्वचा अधिक चांगली राहण्यासाठी उटण्याचा वापर केला जात असे. आता फक्त दिवाळीत उटणं घेण्याचा विचार आपण करतो. कारण दिवाळीची पहिली आंघोळ ही उटण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच आज आम्ही उटण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. (Benefits Of Ubtan) ज्यामुळे तुम्ही त्याचा उपयोग तुमच्या रोजच्या वापरात करु शकाल.
Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाला सोने नाही… पण ही गोष्ट नक्की करा होईल खूपच लाभ
आपल्या देशाला आयुर्वेदाची खूप मोठी परंपरा आहे. आपल्या सगळ्या समस्यांचे निदान हे आयुर्वेदात आहे. पण आताच्या केमिकलच्या काळात आपण आयुर्वेदाला मागे टाकले आहे. इतकेच नाही तर आयुर्वेदाच्या काही गोष्टी करताना त्यासाठी लागणारा वेळ हा देखील अनेकांना घालवायचा नसतो. पण थोडासा वेळ काढा आणि तुमच्या त्वचेची थोडीशी काळजी घ्यायला विसरु नका.
उटण्याचे फायदे करतील आश्चर्यचकित | Benefits Of Ubtan | Diwali 2023
उटण्याचा उपयोग हा केवळ एकाच दिवसापुरता मर्यादित नसावा. त्याचा वापर हा रोज केला तर तुमची त्वचा चांगली करण्यासाठी महत्वाचा आहे. चला जाणून घेऊया उटण्याचे फायदे
- त्वचा डीप एक्सफोलिएट करुन ती स्वच्छ ठेवण्याचे काम उटणं करते. त्यातील कण त्वचा स्क्रब करते. त्यामुळे पोअर्स स्वच्छ होतात आणि पिंपल्सची समस्या होत नाही.
- ज्यांना पिंपल्स आहेत त्यांनी उटणं लावू नये. (Active Acne) वर तुम्ही उटणं अजिबात लावू नका. ते थोडं सुकले की मग तुम्ही त्याचा वापर करु शकता.
- त्वचेला चमक देण्यासाठी उटणं हे फारच लाभदायी असते. त्याच्या उपयोगाने तुमचे संबंध अंग चमकू लागते.
- खूप जणांची त्वचा अनइव्हन टोन असते. अशांची त्वचाही एकसारखी होण्यास उटण्याने मदत मिळते.
- उटण्यामुळे त्वचेला नैसर्गिक मॉश्चरायझर मिळण्यास मदत मिळते.
आता तुम्हीही हे फायदे लक्षात घेऊन उटणं वापरायला विसरु नका.