लक्ष्मी पूजन 2023लक्ष्मी पूजन 2023

Lakshmi Pujan| आपलं घर समृद्ध असावं असं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं. घरात सोनं-नाणं असावं. कशाचीही कमतरता असू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण काही खास दिवशी सगळ्यांनाच सोने खरेदी करणे शक्य असते असे नाही. सोनेच काय तर कोणताही धातू खरेदी करणे शक्य असते असे नाही. अशावेळी तुम्ही निराश होण्यापेक्षा अगदी साधे सोपे उपाय केले तरी देखील तुमच्या घरात सुख- समृद्धी नांदेल. यंदा दिवाळीत खिसा तंग असेल तर तुम्ही काही साध्या साध्या गोष्टी करुन घरात सकारात्मकता आणि चांगल्या संधी कशा आकर्षित कराल हे सांगणारा हा लेख आहे. (Lakshmi Pujan)

मीठाची खरेदी

खूप जण असं म्हणतात की, मिठाची खरेदी ही संध्याकाळी करु नये. मीठ हातावर घेऊ नये वगैरे वगैरै. पण या दिवाळीत तुम्ही मिठाची खरेदी केली तरी देखील ती तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. मिठाची खरेदी करुन त्याचा उपयोग केल्याने तुम्हाला त्याचा फायदाच फायदा होणार आहे. घरात मिठाचा वापर करुन तुम्हाला अधिकाधिक सकारात्मकता आणि यश खेचता येणार आहे.diwali 2023

घरात मीठ आणून ते पाण्यात टाकून त्या पाण्याचे लादी पुसा. त्यामुळे तुमच्याकडे असलेली नकारात्मकता निघून जाईल.(Lakshmi Pujan)

इतकेच नाही तर तुमच्या यशासाठी अडथळा येणाऱ्या गोष्टी देखील निघून जातील.

असे म्हणतात ज्या ठिकाणी स्वच्छता असते अशा ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो. जर तुम्ही घराची स्वच्छता करताना या गोष्टीचे भान ठेवाल तर तुमच्याकडे आपसुकच लक्ष्मी येईल हे विसरु नका.

मिठाची प्रथा

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्वस्त मिळणारे मीठ आणि लक्ष्मीचा काय संबंध. ज्यावेळी चलनात नाणी नव्हती त्यावेळी मिठाची देवाण घेवाण करुन मग व्यवहार केले जात असे. भारतात अशी काही पद्धत आढळून आली नसली तरी आपल्या देशाचा युरोपीय देशाशी व्यापार होत असे. त्यावेळी मिठाची देवाणघेवाण केली जात असे दाखले दिसून आले आहे. इतकेच नाही तर मिठ ही अशी गोष्ट आहे जी श्रीमंत असो वा गरीब सगळ्यांनाच लागते. यात कोणताही भेदभाव होत नाही. त्यामुळे खूप ठिकाणी लक्ष्मीसमोर मिठाची वाटी ठेवण्याची पद्धत आहे.

तुम्हाला काय वाटते? ते आम्हाला नक्की कळवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *