mallikarjun kharge

Mallikarjun Kharge On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काँग्रेसवर ‘व्होट बँक’ खूश करण्याचा आरोप करत आहेत. अनेक दशकांपासून काँग्रेसला मतदान करणाऱ्या मुस्लिम व्होट बँकेचा हा थेट संदर्भ मानला जात आहे. आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्र लिहून पंतप्रधानांना थेट उत्तर दिले आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/X)

( वाचा – Loksabha Election 2024 | दगडफेकीच्या घटनेने मिहीर कोटेचा यांचा संताप, मानखुर्दचे मिनी पाकिस्तान होऊ देणार नाही)

काय म्हणाले खर्गे?

मल्लिकार्जुन खर्गे यांचे पत्र

खर्गे म्हणाले की, आमची व्होट बँक प्रत्येक भारतीय आहे. पत्र ट्विट करताना खरगे यांनी आज लिहिले की, ‘प्रिय पंतप्रधान, मी तुमचे पत्र पाहिले आहे जे तुम्ही एनडीएच्या सर्व उमेदवारांना लिहिले आहे… निराशेपोटी तुम्ही अशी भाषा वापरत आहात जी पंतप्रधानांना शोभत नाही.’ खर्गे यांनी मोदींना सांगितले की, या पत्रावरून असे दिसते की भाषणात सांगितलेल्या ‘खोटेपणाचा’ काहीही परिणाम झाला नाही, आता तुम्हाला NDA च्या उमेदवारांनी तुमचे ‘खोटे’ पुढे रेटले पाहिजे असे वाटते. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात काय लिहिले आहे आणि दिलेले हमीपत्र ते वाचून समजून घेण्याइतके मतदार हुशार आहेत, असे ते म्हणाले.

(वाचा – Ujjwal Nikam | पूनम महाजनांचा पत्ता कट, उत्तर मध्य मुंबईत उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर)

काँग्रेस अध्यक्ष म्हणतात

मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले आहे की, तुम्ही पत्रात दावा केला आहे की एससी, एसटी, ओबीसीचे आरक्षण काढून ‘आमच्या व्होट बँक’ला दिले जाईल, ‘आमची व्होट बँक’ प्रत्येक भारतीय आहे.

काँग्रेस प्रमुखांनी टोमणा मारत म्हटले की, तुमचे पत्र पाहून मला वाटते की, तुम्हाला कमी मतदानाची चिंता वाटत आहे. यावरून असे दिसून येते की लोक तुमच्या धोरणांबद्दल उत्सुक नाही. पंतप्रधान या नात्याने द्वेषपूर्ण भाषणे करण्याऐवजी तुमच्या सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाच्या आधारे मते मागणे योग्य ठरेल, असे खरगे यांनी सडेतोडपणे या पत्रात लिहिले आहे.

(वाचा – South Mumbai Seat | हिंदुत्त्ववादी चेहऱ्याला मिळेल पसंती, दक्षिण मुंबईत राजकीय समीकरणाचा बदल)

काय म्हणाले होते PM? 

अनेक रॅलींमध्ये पीएम मोदींनी सलगपणे सांगितले आहे की, आजकाल राजघराण्याचे राजपुत्र देशभरात मोठ्याने सांगत आहेत की तुमच्या संपत्तीचा एक्स-रे केला जाईल. मंगळसूत्र असो वा इतर कोणतेही दागिने, काँग्रेस आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी ते जप्त करून वाटप करणार असल्याचे जाहीरपणे सांगत आहे. असे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे असे सांगण्यात येत आहे. 

मात्र, कोणाकडूनही काहीही हिसकावण्याबाबत जाहीरनाम्यात लिहिलेले नाही, असा दावा काँग्रेसने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *