रेणुका शहणेंच्या ट्विटवर चित्रा वाघनी लिहिले पत्ररेणुका शहणेंच्या ट्विटवर चित्रा वाघनी लिहिले पत्र

Renuka Shahane-Chitra Wagh सगळीकडे निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अनेक नवे मुद्दे आणि त्यावरुन रंगणारे राजकारण असे सगळे काही पाहायला मिळत आहे. त्यातच अभिनेत्री रेणुका शहाणे हिच्या एका ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मराठी Not welcome म्हणणाऱ्यांना मत देऊ नका असे ट्विट केल्यानंतर भाजप महिला मोर्चाच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी रेणुका शहाणे यांना पत्र लिहित काही गोष्टींचा जाब देखील विचारला आहे.

काय आहे पत्र

 चित्रा वाघ यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे की, आम्ही सर्व आपले खुप मोठे चाहते आहोत, ‘सुरभी’ या कार्यक्रमातून आपण अखंड भारताच्या विविध भाषा, परंपरा, खाद्यसंस्कृती, वेशभूषा याचे घरबसल्या भ्रमण करवले आणि दर्शन घडवले. त्याचा आम्हाला अभिमान आणि कौतुकच आहे. भारतीय विविधतेला एका माळेत गुंफवून ठेवणारा धागा ‘राष्ट्रीयत्वाचा’ आहे, मला खात्री आहे, याची आपल्याला जाणीव असेलच. मराठी भाषा ही सदैव आमची मायबोली आहे. तिचा मान राखणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. आपण ट्वीटमधून मराठी मतदारांना केलेल्या आवाहनाचं टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का? हा संशोधनाचा विषय असू शकतो.

“जर एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे त्याला घर व नोकरी नाकारली जात असेल तर त्याचा मी निषेधच करते. पण मी आपणास विचारू इच्छिते की आपण घाटकोपरमधील सोसायटीमध्ये तुम्ही स्वःत खात्री केली होती का? कारण माझ्या माहितीनुसार त्या सोसायटीत समान संख्येने मराठी परिवारही गुण्यागोविंदाने नांदतात. मी परत सांगते, मराठी भाषेचा आदर केला पाहिजेच. परंतु, तिचा वापर फक्त राजकीय हेतुकरिता होता कामा नये. भाषा ही लोकांना जोडते. ती मराठी असो की राष्ट्रभाषा असो. हे तुमच्यापेक्षा कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. कारण आपण जीवनसाथी निवडताना दुसऱ्या भाषेचा आदरच केला आहे.”

“आपणास एक प्रश्न विचारते की कोव्हिडमध्ये पीपीई किट्स, बॉडी बॅग्स, मास्क, औषधे यात टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना कोट्यवधी रुपयांचे ऑक्सिजन प्लँट्स फक्त कागदावरच लुटून खाल्ले. तसेच आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उर्दूभवन बांधण्यात अतिउत्साह दाखवला. पण मुंबई महापालिकेच्या अर्ध्या अधिक मराठी शाळांना कुलूप लावले. अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार? आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून त्यावर आपण हेतूपुरस्सर मौन बाळगणार का?”

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील गिरगावमध्ये असणाऱ्या एका कंपनीने नोकरीची जाहिरात देत त्यात मराठी नॉट वेलकम असे लिहिले होते. तर दुसरीकडे घाटकोपर येथील एका सोसायटीनेही मराठी लोकांना प्रवेश नाकारल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांवर भाष्य करत रेणुका शहाणे यांनी एक ट्विट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *