चोली के पिछे रिमिक्स गाण्यात दिसणार करीना कपूरचोली के पिछे रिमिक्स गाण्यात दिसणार करीना कपूर

Choli ke Piche हे अभिनेत्री माधुरी दीक्षितचे आयकॉनिक असे गाणे आहे. हे गाणं लागल्यावर जो चेहरा पहिला समोर येईल तो आहे फक्त तिचाच. पण आताच्या या काळात रिमिक्सचा इतका ट्रेंड आहे की जुन्या गाण्यांना नवे कव्हर लावून रिलीज केले जाते. आताच्या या काळात अनेक जुनी गाणी नव्या रुपात आली आहेत. आता या गाण्यामध्ये ‘चोली के पिछे’ या गाण्याचाही समावेश होणार आहे. या गाण्यामध्ये ग्लॅमरस अशी करीना कपूर ( Kareena Kapoor) दिसणार आहे. या गाण्याची एक झलक सध्या सगळ्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.

#Deepveer येत्या सप्टेंबरमध्ये होणार आई-बाबा,म्हणून असे फोटो करत होती पोस्ट

गाण्याला मिळाला नवा तडका

1993 साली आलेल्या खलनायक या चित्रपटातील हे गाणं असून हे अल्का याग्निक आणि इला अरुण यांनी गायलं आहे. हे गाणं आजही अनेकांच्या लक्षात आहे यात कोणतीही शंका नाही. पण आता आगामी चित्रपट ‘क्रू’ मध्ये वापरण्यात आले आहे. हा चित्रपट कॅबिन क्रूवर बनवण्यात आला आहे. यात तबू, करीना कपूर आणि क्रिती सॅनॉन प्रमुख भूमिकेत आहे. या गाण्याची एक झलक आलेली आहे. यामध्ये करीना हॉट पिंक साडीमध्ये दिसत आहे. आता या गाण्यात नवीन काय विचाराल तर या गाण्यात तुम्हाला दिलजीत दोसांजचा आवाज देखील ऐकायला मिळेल. रिमिक्स गाण्याचा हा प्रकार असल्यामुळे याला थोडा लेटेस्टचा तडका देण्यात आलेला आहे.

क्रू हा चित्रपट मल्टी स्टारर आहे. शिवाय या चित्रपटात तुम्हाला दलजीत दोसांज, कपिल शर्मा हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *