Children’s Day | जागतिक बालदिनाचे औचित्य साधत मुंबईत 19 नोव्हेंबर रोजी अनेक ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. महानगरपालिका इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,चर्चगेट स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट मुंबई आणि राजभवन निळ्या रंगात सजवण्यात आले आहे. निळा रंग हे त्यांच्या हक्काचे प्रतिक आहे.

20 नोव्हेंबर 1989 रोजी बालहक्कांसंबंधी जागतिक करार मंजूर झाल्याच्या निमित्ताने, युनिसेफतर्फे हा दिवस जागतिक बालदिन म्हणून साजरा होतो. या जागतिक बालदिनी, युनिसेफ लिंग समानतेचा पुरस्कार करत असून #BeAChampionForGirls (#बीएचॅम्पियनऑफगर्ल्स) या ब्रीदवाक्यासह मुलींच्या हक्कासाठी कायम पुढे राहणार आहे. या निमित्तानेच नोव्हेंबर 19 आणि 20 अशा दोन्ही दिवशी या इमारती निळ्या रंगात सजतील.
20 नोव्हेंबर या जागतिक बालहक्क दिनाच्या पूर्व संध्येला राजभवनातील प्रमुख वास्तूंवर निळ्या रंगात रोषणाई करण्यात आली. त्यामुळे तुम्ही मुंबईत जाणार असाल तर तुम्हाला ही रोषणाई नक्कीच पाहता येईल.