बिग बॉसचा कोणताही सीझन सुुरु झाला की, त्याचा प्रत्येक एपिसोड हा रोमांच आणणारा असतो. भांडण, नवीन रिलेशनशीप असे बरेच काही यामध्ये घडते. पण यंदाचा सीझन हा काहीसा थंडच वाटत आहे. हा सीझन सुरु होऊन डिसेंबर संपत आला तरी या सीझनला काही केल्या रोमांचक असं वळण येताना दिसत नाही. गेल्या काही सीझनपासून तसेही टास्क कमी केल्यामुळे काहीच मजा येत नाही. त्यात यंदाचे सेलिब्रिटी पाहता त्यांची आपलीच एक वेगळी कहाणी घरात सुरु असल्याचे दिसते. कधी कधी हा खेळ फारच रटाळ झाला आहे असे दिसून येते. त्यामुळे यंदाचा हा सीझन पडलाच आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.
अंकिता- विकीचा तोच तोचपणा
सोशल मीडियावर अंकिता आणि विकी कितीही #couplegoal देत असले तरी या घरात आल्यापासून त्यांच्यामध्ये असे काही आहे की नाही यातही जरा शंकाच वाटते. विकी सतत अंकिताला काही ना काही कारणावरुन बोलत राहतो. तर अंकिताचाही कुठेतरी अहमपणा आणि मूर्खपणा सारखा दिसून येतो. जो आता लोकांना पाहायलाही कंटाळवाणा झाला आहे. विकी या खेळात खूपच चलाखपद्धतीने खेळताना दिसतो. त्याला या खेळात जास्त रस आहे. त्याला त्याचे नाते टिकवायचे आहे अस दिसत नाही. शिवाय तो अनेकदा अंकिताचा अपमानही करुन झाला आहे. त्याचा तो पॅटर्न आता कंटाळवाणा झाला आहे.
मनाराचा मूर्खपणा
चोप्रा घरातील मनारा ही आली तेव्हा तिच्यातील एक भोळेपणा सगळ्यांना आवडला होता. ती साधी आणि तितकीच खरी आहे असे वाटले होते. पण या घरातील आठवडे जसे पुढे गेले तशी ती या खेळासाठी नाही असे वाटू लागले. सतत बालिशपणा आणि खेळ समजून न घेता वावरणे आता लोकांनाही नकोसे झाले आहे. त्यामुळे ती या खेळात फक्त तिच्या नावामुळे आहे असे दिसत आहे.
अनुरागबाबाला काही जमेना
युट्युबर अनुराग हा इतरवेळी बाईक राईडिंग करुन लोकांचे मनोरंजन करत असला तरी या घरात त्याची अशी कोणतीही चांगली बाजू दिसून आलेली नाही. खेळ न समजणे, घरी जाण्यासाठी तगादा लावणे, बिग बॉस सोबत वाद घालणे आणि रडणे या शिवाय त्याने फारसे काही केलेले दिसत नाही. पण अजूनही तो या खेळात टिकून आहे.
अभिषेकचा आक्रस्ताळपणा
अभिषेक कुमार हा या घरातील अँग्री यंग मॅन आहे. तो या घरात केवळ चिडण्याचे, मारण्याचे काम करतो असे वाटते. परिस्थिती आणि कारण समजून न घेता त्याला केवळ घरात भांडण कसे करायचे इतकेच काय ते माहीत आहे असे दिसते. त्याला अनेकदा सलमानने समजावले पण तरिही काही गोष्टी त्याला काही केल्या कळत नाही असेच दिसते. त्याचा खेळ हा केवळ चिडणे आणि भांडणे आहे.
मुन्नवरचा तोचतोचपणा
घरात एकमेव चेहरा असा होता जो पहिल्या दिवसापासून जिंकायला आला आहे असे दिसत होते. पण आता मुन्नवर फारुकीही तितकाच बोअर कंटाळवाणा आणि तोच तोच पणा करु लागला आहे. या घरात त्याने अनेक चांगली नाही आणि मैत्री केली असली तरी देखील आता त्याच्या त्याच गुणांचा कंटाळा येऊ लागला आहे.
आता राहिल्या घरातील उरलेल्या व्यक्ति तर त्यांना या घरात कशासाठी आणले आहे तेच कळत नाही. कारण त्यांनी लोकांना इतके काही नवे दिलेले दिसत नाही.