हिवाळ्यात घ्या मुलांची अशी काळजीहिवाळ्यात घ्या मुलांची अशी काळजी

Winter Health | हिवाळा सुरु झाला की, अनेक आजार डोकं वर काढू लागतात.तसे तर वातावरण बदलामुळे खूप जणांना काहीना काही त्रास होतोच. अगदी सर्दी-पडसे तरी वातावरण बदलामुळे नक्की होते. या सीझनमध्ये मुलांची काळजी घेणे फारच जास्त गरजेचे असते. आज आपण या हिवाळ्याला सुखद बनवण्यासाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स जाणू घेणार आहोत.

हिवाळ्यात अशी घ्या लहान मुलांची काळजी Winter Health

प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे अनेकदा या दिवसांमध्ये मुलं आजारी पडतात. त्यांची काळजी घेण्यासाठी खूप काही करण्याची गरज नाही अगदी साध्या सोप्या गोष्टी करुन आपण त्यांची अगदी सहज काळजी घेऊ शकतो.

  • लहानमुलांच्या आहारात या काळात अजिबात दुर्लक्ष करु नका. थंडीच्या दिवसात चौकस आहार घ्यायला अजिबात विसरु नका. मुलांच्या आहारात सिझनल भाज्या, फळे, ड्रायफ्रुट्स असे पदार्थ प्रमाणात पण असू द्या.
  • थंडीत तहान तशी फारच कमी लागते.त्यामुळे पाणी पिणे जास्त होत नाही तुमचे मुलं योग्यप्रमाणात पाणी पित आहे की नाही याची काळजी घ्या. तासाने त्याला पाणी द्यायला अजिबात विसरु नका.
  • अनेकदा थंडी खूप जाणवत नसली तरी वातावरणात जो बदल झालेला असतो त्यानुसार तुमच्या आहारातून काही गोष्टी काढून टाकायलाही हव्यात. या दिवसात सर्दी होऊ शकते. त्यामुळे सर्दी होतील असे पदार्थ जसे की दही, कोल्ड्रिंक्स अशा गोष्टी टाळा.
  • थंडी खूप वाढली की, त्यामुळे ओठ फुटणे, त्वचा फुटणे असे त्वचाविकार होतात. याकडे दुर्लक्ष केले की त्वचेला भेगा पडणे, त्यातून रक्त येणे असे त्रास होतात. त्यामुळे मुलांच्या त्वचेला मॉश्चरायझऱ लावणे गरजेचे आहे. जर त्यांना त्याची एलर्जी असेल तर साजूक तूप, खोबऱ्याचे तेल लावले तरी देखील चालू शकते.
  • वेगवेगळ्या भाज्यांचे लज्जतदार सूप्स देखील तुम्हाला या काळात चालू शकतील. त्यामुळे तुमची आणि मुलांची दोघांची प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत मिळते.

हिवाळ्यात लहान मुलांची अशी घ्या काळजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *