gaslighting effect

जेव्हा कोणी तुमच्या आत्मविश्वासाकडे सतत बोट दाखवू लागते. अथवा एखादी व्यक्ती तुम्हाला सांगत राहतो की तुम्ही चुकीचे करत आहात, तो तुमच्या बुद्धिमत्तेवर आणि तुमच्या स्मरणशक्तीवरही प्रश्नचिन्ह उभे राहाते. ज्यामुळे तुम्ही स्वतःवरच नाराज होऊ लागतात आणि आतून तुटायला लागता त्यालाच गॅसलायटिंग असे म्हटले जाते. 

गॅसलाइटिंग हा भावनिक शोषणाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती मानसिकरित्या तुमचा स्वतःवरील विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करते. तुमच्या घरात, कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी गॅसलाइटिंग कुठेही होऊ शकते. नातेसंबंधांमध्ये आणि कामाच्या ठिकाणी गॅसलाइटिंग सामान्यतः दिसून येते. म्हणून, त्याची चिन्हे ओळखणे फार महत्वाचे आहे, तरच आपल्याला गॅसलायटिंग टाळता येते आणि स्वत: ला सुरक्षित ठेवू शकता. (फोटो सौजन्य – iStock)

नातेसंबंधातील गॅसलायटिंग

नातेसंबंधात, तुमचा जोडीदार तुमचा गैरफायदा घेतो, तुमची दिशाभूल करतो आणि तुम्हाला इतके कमकुवत बनवतो की तुम्ही फक्त त्याच्यावरच विसंबून राहता, ज्यामुळे त्याचा उद्देश पूर्ण होतो. तुमचा पार्टनर तुमचा मानसिक छळ करतो, जो तुम्ही समजू शकत नाही.

Gaslighting: शब्द कोठून आला?

गॅसलाइटिंग हा शब्द 1938 च्या पॅट्रिक हॅमिल्टनच्या ‘गॅस लाइट’ या स्टेज प्लेवर आधारित चित्रपटातून आला आहे. या नाटकात, एक अत्याचारी पती आपल्या घरातील गॅसचे दिवे मंद करतो आणि आपल्या पत्नीला दिव्यांबद्दल गोंधळात टाकतो तसंच तिला दिव्यांबाबत गोंधळ आहे असेच तिच्या मनात भरवतो. यानंतर, 60 च्या दशकात “गॅसलाइटिंग” हा सामान्यतः वापरला जाणारा शब्द बनला. ज्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीची विचार करण्याची आणि समजण्याची स्थिती बदलणे आणि त्याची दिशाभूल करणे.

(वाचा – Divorce Reason | ५ कारणाने होतोय सर्वात जास्त घटस्फोट, तिसरे कारण वाचाल तर व्हाल हैराण)

गॅसलाइटिंग ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणीदेखील

हे तुमच्या कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणीही घडते. ज्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जातो की तुम्ही नीट काम करू शकत नाही, तुम्हाला गोष्टी आठवत नाहीत, (पण तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण आहे, तुम्ही गोष्टी विसरत नाही हे तुम्हाला चांगलं माहीत आहे) पण सतत सांगितल्याने तुमचा आत्मविश्वासही कमी होऊ लागतो.

दुसरी व्यक्ती तुम्हाला दोष देऊ लागते की तुम्ही त्याला गोंधळात टाकत आहात किंवा त्याला चुकीचे सांगत आहात. जर तुमच्यासोबतही असे घडले असेल तर समजून घ्या की तुम्ही गॅसलाइटिंगचे शिकार होत आहात. यामुळे तुमचा आत्मविश्वास कमकुवत होतो, तुम्ही स्वतःला दोष देऊ लागता, या सर्व परिस्थिती खूप त्रासदायक असते हे लक्षात घ्या. 

(वाचा – ब्रेकअप झाले म्हणून चुकूनही करु नका या गोष्टी)

मानसिक आरोग्यावर परिणाम 

गॅसलाइटिंगमुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होतो. हे खूप धोकादायक आहे, यामध्ये तुम्ही स्वतःला अंतर्गत दोष देण्यास सुरुवात करता, तुमची इच्छाशक्ती कमी होऊ लागते. गॅसलाइटिंग एखाद्या व्यक्तीच्या आत्मसन्मानावरच वार करते, ज्यामुळे त्यांना असे वाटते की त्यांच्यासोबत जे घडत आहे त्यासाठीच ते पात्र आहेत. 

नाते तुटल्यावरही परिणाम

जरी आपण टॉक्सिझ रिलेशनशिपमधून बाहेर आलो असलो तरीही गॅसलाइटिंगचे परिणाम कायम राहतात. तुम्ही त्यावर लवकर मात करू शकत नाही, कारण गॅसलाइटिंग करणाऱ्या व्यक्तीने तुम्हाला आतून अगदी खोलवर दुखावलेले असते. तुमचा स्वाभिमान नष्ट करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलेला असतो आणि त्यामुळे तुम्ही स्वतःचा द्वेष करू लागता. ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. 

स्वतःवर संशय घेणे 

गॅसलाइटिंगमुळे मानसिक समस्या, चिंता, नैराश्य यासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात. बळी स्वतःवर संशय घेण्याच्या स्थितीत येतो. त्याचा आत्मसन्मान कमी होतो, त्याचा स्वतःच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही, त्याला स्वतःबद्दल कमी आत्मविश्वास वाटू लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *