Weight Gain ऐकून थोडा धक्का बसला असेल नाही का? आपल्यापैकी खूप जणांना वजन कमी करण्याची गरज आहे. तर असे कोण आहेत ज्यांना वजन वाढवायचे आहे असा तुम्हाला विचार पडला असेल. ही गोष्ट अगदीच स्वाभाविक आहे. जितक्या लोकांना वजन कमी करण्याची गरज असते. तसेच अनेकांना वजन वाढवण्याची देखील तितकीच गरज आहे. परंतु ज्यांचे वजन कमी आहे त्यांना वजन वाढवायचे असेल तर त्यांचे वजन कसेही वाढवून किंवा कसेही खावून चालत नाही. तर त्यांना त्यांचे वजन योग्य पद्धतीने वाढवणेच गरजेचे असते. म्हणूनच अशांसाठी आज आम्ही परफेक्ट असा डाएट प्लॅन शेअर करत आहोत.
superFoods| प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी 5 सुपरफूड्स
वजन वाढवणे कोणासाठी?
वजन वाढवण्याची गरज खरंच कोणाला आहे ? असे तुम्हाला वाटत असेल तर आपल्या उंचीनुसार वजनाचा एक तक्ता असतो. तितके तुमचे वजन असायला हवे. जर तुमचे वजन त्याहून कमी असेल तरी देखील तुम्हाला अनेक शारिरीक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. म्हणूनच तुम्ही तुमच्या वय, उंचीनुसार वजन नियंत्रणात ठेवायला हवे. जर तुमचे वजन हे खूपच कमी असेल तर अशावेळी तुम्ही योग्यपद्धतीने वजन वाढवणेदेखील तितकेच गरजेचे आहे. केवळ बारीक आहात म्हणून वजन वाढवण्याचा विचार अजिबात करु नका. तुमचे वजन तक्त्यामध्ये कमी असेल तरच तुम्ही तुमचे वजन वाढवण्याचा निर्णय घ्या.
हेल्दी पद्धतीने असे वाढवा तुमचे वजन Weight Gain
तुम्हाला तुमचे वजन अगदी हेल्दी पद्धतीने वाढवायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात नेमकं काय घ्यायला हवे. हे सांगणाऱ्या पदार्थांची यादी पुढीलप्रमाणे
- नाश्ता : दिवसभरातील पहिले मिल हे आपल्या सगळ्यांसाठीच फार महत्वाचे असते. त्यामुळे वजन वाढवणाऱ्यांनी तर हे मिल अजिबात स्कीप करता कामा नये. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही दोन अंडी, ब्रेड, एक ग्लास दूध, आम्लेट अशांचा समावेश करायला हवा. अंड्याचा पिवळा बलक हा देखील तुम्ही खाल्ला तरी चालू शकतो.
- मिड मॉर्निंग स्नॅक : नाश्त्यानंतर साधारण एक तासानंतर पुन्हा तुम्ही काहीतरी खायला हवे. या वेळात तुम्ही फळं खाणं हे सगळ्यात जास्त उत्तम अशते. एखादं केळं, आंबा, पपई किंवा तुमच्या आवडीचे फळ तुम्ही खायला हवे. यासोबत तुम्ही एक मूठभर ड्रायफ्रुट खाणे अधिक चांगले
- दुपारचे जेवण : दुपारचे जेवण हे परिपूर्ण असयला हवे. यामध्ये तुम्ही एक भाजी, चपात्या, डाळ, कोशिंबीर, एखादा गोड पदार्थ असे असायला हवे. दर दिवशी वेगवेग्या डाळींचा समावेश केल्यास तुम्हाला कंटाळा देखील येणार नाही. त्यामुळे तुम्ही विविध रेसिपीज ट्राय करा.
- संध्याकाळचा नाश्ता : संध्याकाळचा नाश्ता करताना तुम्हाला त्यामध्ये मखाणा, शेंगदाणे, चणे अशांचा समावेश केला तरी चालेल. या वेळात एखादे सँडवीज खाल्ले तरी देखील चालू शकेल.
- रात्रीचे जेवण : रात्रीचे जेवण हे पचायला हलके हवे हे आपण जाणतो. त्यामुळे जेवणात कोणत्याही गोष्टींचा समावेश करताना तुम्ही पचनाचा त्रास होणार नाही याचाही विचार करायला हवा. यामध्ये पुन्हा एकदा संपूर्ण जेवण परंतु कमी प्रमाणात असणे फार जास्त गरजेचे आहे. यामध्ये चिकन, फिश, चपाती, कोशिंबीर याचा समावेश हवा.
हे ही हवे माहीत
वजन वाढवायचे म्हणजे भरभरुन केवळ खायचे असे होत नाही. तुम्हाला काही गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचे आहे. अनेक जण केवळ खाणेच सुरु ठेवतात. त्यामुळे तुमचे वजन 100% वाढेल. पण त्यामुळे तुम्हाला अन्य काही त्रास होण्यासही सुरुवात होऊ शकते. त्यामुळे या गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घ्यायला हवी.
- वजन वाढवणे म्हणजे केवळ आराम करणे नाही. तुम्हाला वजन वाढवताना व्यायामही तितकाच महत्वाचा असतो. अगदी थोडा व्यायाम हा तितकाच महत्वाचा आहे.
- दिवसभरातून पाणी पिणेही तुमच्यासाठी तितकेच महत्वाचे आहे.
- खाऊन अजिबात झोपू नका. कारण त्यामुळे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता आहे.
- वजन वाढवताना खूप फॅट असलेले पदार्थ, जंक फूड खाऊ नका. त्यामुळे तुम्हाला अन्य विकार होण्याची शक्यता असते.
- तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन, फॅट्स, कार्ब्स असायलाच हवेत.
आता वजन वाढवताना या गोष्टींचा नक्की विचार करा.