Summer Update एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.अनेक ठिकाणी सूर्य आग ओकू लागला आहे. त्यातच आता विदर्भातील नागरिकांना पुढील काही काळासाठी काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. विदर्भात उष्णतेचा पारा इतका वाढला आहे की, त्यामुळे अनेकांना सनस्ट्रोक येण्याची शक्यता असते. विदर्भात अशा अनेक घटना घडतात. पुढील 3 दिवस हे अतिउष्णतेचे असणार आहे. त्यामुळेच नागरिकांना अति काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात वाढला उष्णतेचा पारा
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात उष्णता अधिक वाढली आहे. यात लोकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस हे अधिक उष्णतेचे असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. हे तापमान 42 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच काळजी घेणे अनिवार्य आहे.
Summer Update अशी घ्या काळजी
हवामानातील हे बदल पाहता आपण काही गोष्टींची काळजी घेणे फारच जास्त गरजेचे आहे. या काळात तुम्ही काय बदल करायला हवेत ते आता जाणून घेऊयात
- उन्हाचा तडाखा बसू नये यासाठी योग्य आहार घ्या. भरपूर पाणी प्या.
- आहारामध्ये जास्तीत जास्त फळं आणि भाज्या असू द्या. पचनाचा सहद सोप्या अशा गोष्टींचा समावेश करा.
- सुती कपडे वापरा. त्यामुळे वातावरणात असलेली उष्णता आपल्या शरीरावर परिणाम करत नाही.
- उन्हात बाहेर पडताना छत्री किंवा स्कार्फ घेऊन बाहेर पडा. त्यामुळे तुम्हाला उष्णतेचा त्रास होणार नाही.
आता उन्हात कुठेही बाहेर पडताना तुम्ही आरोग्याची काळजी घ्यायला विसरु नका.