लग्नानंतर नवरा बायकोचे काही कारणास्तव खटकले की, कधी कधी काही गोष्टी टोकाला जाऊन पोहोचतात हे अगदी खरे आहे. पण हल्ली अशी काही कारणं समोर येऊ लागली आहेत. त्यामुळे हे सगळं अजब-गजब आहे असे म्हणायची वेळ आली आहे. आग्र्यात अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामुळे लग्न करावे की नाही असा प्रश्न पडणार आहे. अगदी क्षुल्लक कारणावरुन एका नवऱ्याने आपल्या पत्नीकडून घटस्फोट मागितला आहे. नेमकं हे प्रकरण काय? चला घेऊया जाणून
आग्र्यात एका जोडप्याचे सध्या समुपदेशन सुरु असल्याचे समजत आहे. लग्नाच्या 8 महिन्यानंतर पत्नीपासून वेगळे होण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. यासाठी त्याने जे कारण दिले आहे ते ऐकून आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. पत्नी आपल्या आवडीची साडी नेसत नाही, आपला कोणताही निर्णय ऐकत नाही. याचा राग ठेवून त्याने घटस्फोटाचा अर्ज केला आहे. पण इतक्या कमी वेळात असा निर्णय त्याने का घ्यावा असा प्रश्नच आहे. त्यामुळेच त्यांना घटस्फोटापासून परावृत्त करण्यासाठी त्यांचे समुपदेशन सध्या सुरु आहे. त्यात ज्यावेळी त्याला माहिती विचारण्यात आली. त्यावेळी त्याने सांगितले की, माझे माझ्या पत्नीवर जीवापाड प्रेम आहे. पण ती माझ्या पसंतीशिवाय साडी नेसलेली मला अजिबात पटत नाही. ती जेव्हा माझ्या आवडीची साडी नेसते त्यावेळी मला आनंद होतो. पण ती ज्यावेी मााझ्या आवडीची साडी नेसत नाही त्यावेळी माझी चिडचिड होते.
याला कंटाळून पत्नीने सासर सोडून माहेरी जाणे पसंत केले. सध्या हे दोघे वेगळे राहात असून त्याचे समुपदेशन सुरु आहे. या दोघांमधील वाद आटोक्यात आणण्याचा प्रयत्न देखील सुरु आहे.