सदा सरवणकरसदा सरवणकर

सध्या सर्वत्र सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्या गौप्यस्फोटाची चर्चा होत आहे. ‘विधानसभेच्या उमेदवारीसाठी मला संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या घरावर पेट्रोल टाकून जाळायला सांगितले होते’, असा गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे. कोल्हापूरातील एका जाहीर कार्यक्रमात सदा सरवणकरांनी हा आरोप केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी मला मनोहर जोशी यांनी मातोश्रीवर जाण्यासाठी सांगितले होते. ज्यावेळी मी मातोश्रीवर गेलो त्यावेळी मनोहर जोशी यांनी तुमचे तिकीट कापले, असे सांगण्यात आले. त्यामुळे तुम्ही त्यांच्या घरावर हल्ला करा, असा निरोप मला मिलिंद नार्वेकर यांनी दिला. त्यानंतर संजय राऊत यांनी मला फोन केला. त्यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) मला म्हणाले की, मनोहर जोशी यांच्या घराजवळ जाताना पेट्रोल पंप लागतो तिथून पेट्रोल घेऊन घर पूर्ण जाळून टाका, काही शिल्लक ठेऊ नका, असे सांगितले. त्यामुळेच आपण मनोहर जोशींच्या घरावर हल्ला केला, मातोश्रीचा आदेश आम्ही पाळला असे सदा सरवणकर यांनी सांगत एकच खळबळ उडवून दिली.

यावेळी सदा सरवणकर यांनी आणखीन एक आरोप केला. आपल्याकडून विधानसभेच्या उमेदवारीसाठी दहा कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला. मी 10 कोटी रुपये देऊ शकत नसल्याने आदेश बांदेकरांना मातोश्रीतून उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू झाला. शिवसैनिकांची कोंडी करण्याची आणि त्यांना जाळ्यात अडकविण्याचे काम बाळासाहेबांच्या काळात कधी झाले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे यांना मोठे करायचे होते. तेव्हा ठाकरे आमदारांच्या चेहऱ्याकडेही पाहायचे नाहीत. अनेकांना त्यांची भेट मिळत नसल्याने शिवसैनिकांनी शिंदे यांच्या नेतृत्त्वाला साथ दिली, असेही सदा सरवरणकर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *