लहान मुलं का पडत आहेत आजारीलहान मुलं का पडत आहेत आजारी

हल्ली लहान मुलं ही लवकर झोपत नाही,अशी तक्रार आजकाल अनेक पालक करतात. त्यामुळे मुलांचे आरोग्यही चांगले राहात नाही असे देखील दिसून आले आहे. ही हल्ली अनेकांचाशी चिंतेची बाब बनली आहे. काही गोष्टींकडे पालक म्हणून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला हे काही त्रास होणारच असेदेखील एका अभ्यासांती समोर आले आहे. हल्लीच्या मुलांना काही गोष्टी लवकर मिळाल्यामुळे त्यांच्या वागणुकीतही बदल होऊ लागला आहे. त्याचा त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम मुलांसाठी अधिक घातकी ठरत आहे.

Late Night Dinner | रात्री उशिरा जेवत असाल तर तुम्हाला माहीत हवेत हे नियम

या कारणामुळे लहान मुलं पडत आहेत आजारी

हल्लीची मुलं आजारी होण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. काहीही न करता मुलं आजारी पडतात. यामागे काही कारणं असल्याचे निदर्शनास आले आहे.

  1. अति मोबाईलच्या वापरामुळे मुलांना झोप येत नाही. त्यांना निद्रानाश झाल्याचे दिसून आले आहे. इतकेच नाही तर त्यांना फोनची इतकी सवय लागली आहे की,फोन दिसला नाही तर त्यांना अधिक त्रास होऊ लागतो. मुलांना फोन पासून जितकं लांब ठेवता येईल तेवढं ठेवा.
  2. मुलांचय्या खाण्यापिण्याच्या सवयीही चांगल्याच बदललेल्या आहेत. या बदलत्या खाण्याच्या सवयीचा परिणाम असा की, त्यांना झोप येत नाही. पण त्यांचे वजन वाढत राहते. जंकफूडचे अतिसेवन हे मुलांना त्रासदायक ठरत आहे.
  3. अनियमित वेळ ही देखील अनेकवेळा मुलांच्या बदलत्या लाईफस्टाईलसाठी कराणीभूत ठरते. मुलांची झोप, त्यांचे जेवण आणि खेळण्याची वेळ हे सगळं काही अगदी वेळेवर व्हायला हवे. असे झाले तर मुलांना चांगल्या सवयी लागतील.

आता जर तुम्हीही या चुका करत असाल तर या गोष्टी लवकरात लवकर सुधारा त्यामुळे तुमच्या मुलांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *