Raj Thackeray यांच्या संदर्भातील एक अत्यंत महत्वाची अशी बातमी समोर येत आहे. त्यांची मुलगीही टेक्नॉलॉजीचा शिकार झाली आहे. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हीचे Deepfake करण्यात आले होते. हे प्रकरण सगळ्यांसमोर आले म्हणून कळले. पण आता राज ठाकरेंच्या मुलीचेही असेच Deepfake करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ही माहिती मीडियाला दिली आहे. त्यामुळे Deepfake दिवसेंदिवस किती भयानक होणार आहे याचा अंदाज येऊ लागला आहे.
टेक्नॉलॉजीने अनेक गोष्टी सोप्या आणि साध्या केल्या असल्या तरी नाण्याला दुसरी बाजू असते अगदी त्याचप्रमाणे आता Deepfake नावाच्या या ॲपने खूपच गोंधळ घातला आहे त्यामुळे अनेकांना सोशल मीडियावर फारच जपून राहण्याची वेळ आली आहे. राज ठाकरे यांच्या मुलीचेही Deepfake करण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे. त्यांनी या संदर्भात वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार देखील केली आहे. असे करणाऱ्यांना पकडण्यात देखील आले आहे. परंतु आपल्या देशात या संदर्भात कोणताही कायदा नसल्यामुळे त्याचे काही होत नाही. आपल्याकडे असलेले ब्रिटीशकालीन कायदे हे फार तकलादू असल्याचे देखील त्या म्हणाल्या आहेत. Deepfake सारख्या भयंकर टेक्नॉलॉजीला आताच आवरणे फार जास्त गरजेचे आहे. नाहीतर त्यामुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त होईल.
Deepfake बद्दल तुमचे मत काय आहे? तुम्हालाही वाटते का हे आताच बंद व्हायला हवे.